मुंबई : महागाईच्या बाबतीत मुंबई सुस्साट सुटलीय. परदेशी व्यक्तींना राहण्याच्या हिशोबानं देशाची आर्थिक राजधानी मुंबई अतिशय महागडी ठरतेय. याबाबतीत मुंबईनं मेलबर्न आणि फ्रॅकफर्टलाही मागे टाकलंय. एका सर्व्हेनुसार, मुंबई मेलबर्न आणि फ्रॅकफर्ट सारख्या शहरांच्या तुलनेत अतिशय महाग ठरतंय. हा सर्व्हे ग्लोबल कन्सल्टिंग फर्म 'मर्सर'नं जाहीर केलाय. उल्लेखनीय म्हणजे २०१६ सालीही मुंबईचा समावेश महागड्या शहरांमध्ये झाला होता. २०१७ च्या आकडेवारीनुसार पॅरिस, कॅनबरा, सिएटल, वियना यांसारख्या शहरांना मागे टाकत मुंबईनं महागाईत वरचा क्रमांक मिळवला. यानुसार, मुंबई ५७ व्या स्थानावर होती. तर मेलबर्न ५८, फ्रॅकफर्ट ६८, ब्युनस आयर्स ७६, स्टॉकहोम ८९ तर अटलांटा ९५ व्या स्थानावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईपेक्षा दिल्ली १०३, चेन्नई १४४, बंगळुरू १७०, कोलकाता १८२ अशा क्रमांकावर असून ते कमी महागडे ठरलेत. 


सर्व्हेनुसार, मेलबर्न आणि ब्युनस आयर्सच्या रँकिंगमध्ये घसरण झालीय तर मुंबई मात्र वरच्या क्रमांकावर ढकलली गेलीय. कारण, मुंबईमध्ये खाद्य पदार्थ, अल्कोहोल, घरगुती निर्यातीच्या किंमतींत वाढ झालीय. 


या लिस्टनुसार, प्रवाशांसाठी हाँगकाँग जगातील सर्वात महागडं शहर ठरलंय. या सर्व्हेसाठी यंदा रँकिंगसाठी न्यूयॉर्कचा वापर 'बेस' म्हणून करण्यात आला.