`या` समुद्रात पोहणे म्हणजे आयुष्याशी खेळ, खूप धोकादायक आहे हा समृद्र... जाणून घ्या
शास्त्रज्ञांनी लाल समुद्राच्या पृष्ठभागावर 10 फूट लांबीचा खारा तलाव शोधून काढला आहे, जो समुद्री जीव आणि मानवांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक रहस्यम गोष्टी असतात. ज्यांच्याबद्दल जाणून घेणे अनेकांना आवडते. त्यामुळेच तर लोक गुगल किंवा पुस्तकातून हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्यमय गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जे एका समुद्राशी निगडीत आहे. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही देखील थक्कं व्हाल. लाल समुद्रात एका विशिष्ट भागात एक तलाव आहे, त्याचे पाणी अत्यंत खारट आहे. काही शास्त्रज्ञांच्या टीमने याबद्दल शोधून काढले आहे. या टीमचा एक भाग असलेल्या एका शास्त्रज्ञाने खुलासा केला की, तलावामध्ये ऑक्सिजन नाही आणि यामुळेच येथे कोणत्याही जीवाचे अस्तित्व अशक्य आहे.
शास्त्रज्ञांनी लाल समुद्राच्या पृष्ठभागावर 10 फूट लांबीचा खारा तलाव शोधून काढला आहे, जो समुद्री जीव आणि मानवांसाठी अत्यंत धोकादायक आहे. हा अनोखा तलाव जास्त खारट आहे. या शोधामुळे पृथ्वीवरील जीवनाच्या मर्यादा शोधण्यात मदत होऊ शकतं.
एका प्रसिद्ध वृत्तानुसार, मियामी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमने 'डेथ पूल'चा शोध लावला आहे. या शोधातून असे दिसून आले की, ब्राइन पूलमध्ये ऑक्सिजन नाही, ज्यामुळे ते कोणत्याही समुद्री जीवाचा येथे मृत्यू होऊ शकतो. या टीमला रिमोटली ऑपरेटेड अंडरवॉटर व्हेइकल (ROV) वापरून 1 हजार 770 मीटर खोलीवर हा पूल सापडला.
तुम्ही याआधी अशा कोणत्याही समुद्राविषयी ऐकलं आहे का? ज्याच्या तळाशी एक प्राणघातक तलाव आहे, ज्यामध्ये पोहणाऱ्या कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होतो?
महासागराच्या या खोलीवर सहसा फारसे जीवन नसते. शास्त्रज्ञाने सांगितले की, हा शोध भविष्यात शास्त्रज्ञांना लाखो वर्षांपूर्वी आपल्या ग्रहावर महासागर कसे तयार झाले हे शोधण्यात मदत करू शकेल.