UFO : `या` बेटांजवळ दिसली निळ्या रंगाची रहस्यमय आकृती; हे एलियन्सचे UFO तर नाही ना?
अमेरिकेच्या हवाई बेटांवर आकाशात एक निळ्या रंगाची आकृती फिरताना दिसली. ही गोलाकार आकृती अवकाशातील आकाशगंगेप्रमाणे दिसत आहे. ही आकाशगंगेप्रमाणे दिसणारी निळी आकृती अत्यंत वेगाने फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
UFO In America : अमेरीकेतील हवाई बेटांजवळ (Hawaii island of America) निळ्या रंगाची रहस्यमय आकृती दिसली आहे. ही आकृती पाहून वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत. हे एलियन्सचे UFO (Unidentified Flying Objects) तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. या आकृतीचे छायाचित्र सटेलाईट कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या रसहस्यमयी आकृतीचे गूढ आणखी वाढले आहे.
18 जानेवारी रोजी ही आकृता दिसली आहे. अमेरिकेच्या हवाई बेटांवर आकाशात एक निळ्या रंगाची आकृती फिरताना दिसली. ही गोलाकार आकृती अवकाशातील आकाशगंगेप्रमाणे दिसत आहे. ही आकाशगंगेप्रमाणे दिसणारी निळी आकृती अत्यंत वेगाने फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही आकृती वेगाने फिरत असताना अचानक पुन्हा गायब होते. अचानक गायब झालेली ही आकृती म्हणजे एलियन्सचे UFO तर नाही ना असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे.
ही रहस्यमयी आकृती जपानच्या सुबारू टेलिस्कोपने सर्व प्रथम आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचे समजते. टेलिस्कोप सेंटरच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. SpaceX च्या Falcon-9 रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर काही वेळातच सुबारू दुर्बिणीने ढगांचा हा रहस्यमयी भोवरा फिरताना पाहिला. या रॉकेटमध्ये अमेरिकन सैन्याचा एक मोठा उपग्रह होता.
रहस्यमयी व्हिडिओबाबत खुलासा
व्हिडिओचा सखोल अभ्यास केल्यानंतर या रसहस्यमटी आकृतीबाबत मोठा खुलासा झाला आहे. स्पेसएक्सच्या रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर रॉकेटचा दुसरा भाग वेगळा झाल्यानंतर तेथे तयार झालेल्या इंधनाच्या ढगांपासून तयार झालेला भोवरा म्हणजे ही आकृती आहे. जेव्हा पहिल्या टप्प्याचे रॉकेट दुसऱ्या टप्प्यापासून वेगळे होते तेव्हा अशा प्रकारच्या आकृत्या तयार होतात. हे रॉकेट पृथ्वीवर परत येताना दुसरा टप्पा उपग्रहाला अवकाशाच्या दिशेने ढकलतो. असा स्थितीत ही आकृती तयार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याला स्मोक रिंग असेही म्हणतात. अमेरिकेतून एलियन्स पाहिल्या बद्दलचे दावे होणं नवं नाही. सुपरपावर असलेल्या अमेरिकेने नेवाडामधल्या एरिया-51 (Area-51) या भागात प्रयोगासाठी एलियन्सना कैद करून ठेवल्याच्याही चर्चा अधून मधून होत असतात.