चंद्रापर्यंत गॅस पाईप लाईन टाकणार? मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी NASA चा मोठा प्रोजेक्ट
Gas Pipe On Moon : चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने नासाने मोठी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत थेट चंद्रापर्यंत पाईपलाईन टाकली जाणार आहे.
NASA Moon Mission: चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरचं प्रत्यक्षात साकारणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने नवं मून मिशन हाती घेतेले आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रापर्यंत गॅस पाईलाईन टाकली जाणार आहे. चंद्रावर गॅस पाईपलाईन टाकण्याचा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास. चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या मोहिमेतील हा मोठा माईलस्टोन ठरणार आहे. जाणून घेऊया काय आहे नासाची योजना.
हे देखील वाचा.... 2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी
नासाच्या या मून मिशन अंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन गॅस पाइपलाइन टाकण्याची योजना आहे. आर्टेमिस असं नासाच्या या विशेष मोहिमेचे नाव असणार आहे. आर्टेमिस हे नासाचे अत्यंत महत्वाची मोहिम आहे. आर्टेमिस मिशन अंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ऑक्सिजन पाइपलाइन (L-SPOP) टाकली जाणार आहे. चंद्राच्या रेगोलिथमधून ऑक्सिजन आणि चंद्राच्या बर्फातून पाणी काढण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी नासाने मोठी गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पासह नासा गॅस पाइपलाइन प्रकल्पात गुंतवणूक करणार आहे.
हे देखील वाचा... Gold Planet : 'या' ग्रहावरचं सर्व सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येकच्या वाट्याला 10 हजार कोटी येतील; 2026 ला NASA चे यान पोहचणार
2026 पर्यंत चंद्रावर पाईपलाईन टाकण्याचे टार्गेट आर्टेमिस मिशन अंतर्गत ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ऑक्सिजन द्रवरूपात कंटनेरमध्ये साठवण्याचे काम सुरू केले आहे. ऑक्सिजनचे हे कंटेनर चंद्राच्या पृष्ठभागावर नेले जाणार आहेत. हा प्रोजेक्ट खूपच खार्चतिक आणि क्लिष्ट आहे. मात्र, हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर, चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करण्याचे नासाचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरणार आहे.
चंद्रापर्यंत 5 किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याची नासाची योजना आहे. एल-एसपीओपी अंतर्गत, नासा चंद्राच्या रेगोलिथपासून तयार झालेल्या धातूंचा वापर करून रोबोट यंत्रांच्या मदीतीने हे पाईपलाईन टाकण्याचे काम केले जाणार आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून 2 किलोग्रॅम प्रति तास या वेगाने ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने पाईपलाईनची योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. या ऑक्सीजन पाईपच्या मदतीने चंद्रावर राहण्यासाठी आवश्यक असलेली किमान वीजही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही योजना यशस्वी जाल्यास मानव कोणत्याही समस्येशिवाय चंद्रावर सुमारे 10 वर्षे जगू शकतो.