Nepal Plane Crash Video :  काठमांडूहून  72 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान रविवारी सकाळी नेपाळमधील (Nepal)  पोखराजवळ  (Pokhara)  दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान अपघातात (Plane Crash) 68 प्रवाशांचा बळी गेला आहे. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या विमानातील एका प्रवासाने विमान प्रवासदरम्यान फेसबुक लाईव्ह करत होता. त्यावेळी हा अपघात झाला आणि तो कॅमेऱ्यात कैद झाली. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मिळालेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे विमान आदळल्याचं सांगितलं जातं आहे. या विमानात 15 परदेशी नागरिक आणि सहा मुलांशिवाय 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 2 कोरियन, 1 अर्जेंटिनियन आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समधील प्रत्येकी एक प्रवासी विमानात होते, असं एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटलंय. 



यापूर्वी झालेल्या घटना


मे 2022 मध्ये  नेपाळी वाहक तारा एअरने चालवलेल्या विमानातील सर्व 22 लोक, ज्यात 16 नेपाळी, चार भारतीय आणि दोन जर्मन असे प्रवासी असणारे विमान क्रॅश झाले होते. यात सर्व प्रवासी मरण पावले होते. 


मार्च 2018 मध्ये काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ यूएस-बांगला एअरलाइन्सचं विमान क्रॅश-लँड झालं होतं. या दुर्घटनेत 51 जणांचा बळी गेला होता. 


1992 मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान काठमांडूकडे जाताना क्रॅश झालं तेव्हा त्यातील सर्व 167 लोक मरण पावले होते. ही सर्वात हादरवून टाकणारी घटना होती. 


दोन महिन्यांपूर्वी याच विमानतळाजवळ थाई एअरवेजचं विमान कोसळून 113 जणांचा मृत्यू झाला होता.