Coronavirus: गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. कोरोनाची (Corona) लाट थांबत नाही तोच आता आणखी एका साथीच्या आजाराने दार ठोठावलं आहे. या आजाराची लक्षणंही कोरोनासारखीच आहेत. त्यामुळेच सुरुवातीला नेमका कोणता आजार आहे हे कळणं कठीण झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची तीन सामान्य लक्षणं
कोरोना व्हायरसची तीन सामान्य लक्षणं आहेत. यात रुग्णांमध्ये खोकला, चव आणि वास न येणं आणि ताप ही तीन लक्षणं दिसतात. 


नव्या आजाराची साथ
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी आता नव्या आजाराचा इशारा दिला आहे. जगातील काही देशात रायनोव्हायरस (Rhinovirus) नावाच्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराची लक्षणंही कोरोनाच्या लक्षणाशी मिळती जुळती आहेत. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यानंतरही रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असला तरी त्या रुग्णाला Rhinovirus आजाराची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.


ब्रिटनमध्ये आरोग्य विभागाने दोन्ही व्हायरसपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी नव्या गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. लोकांना या आजारापासून जागरुक करणं आणि या आजाराची साथ रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


लक्षणं आढळताच विलिगीकरणाचे आदेश
ब्रिटिश सरकारने जारी केलेल्या नव्या गाईडलाइन्सनुसार रुग्णाची कोरोटा टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्याला डोकेदुखी, खोकला, किंवा सर्दीचा त्रास होत असेल तर ही Rhinovirus ची लक्षणं असू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णाला घरात विलिगीकरणात ठेवण्यात यावं असं सांगण्यात आलं आहे.


विलिनीकरणादरम्यान खास खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. रुग्णाचे कपडे, भांडी आणि टॉयलेट वेगळं आणि स्वच्छ ठेवावेत, तसंच या रुग्णाच्या संपर्कात कोणी येऊ याची विशेष खबरदारी घ्यावी, डॉक्टरांसोबत फोनवरुन सतत संपर्कात राहावं असे निर्देशही देण्यात आले आहेत.