Covid | काय सांगता! कोरोनामुळे टक्कल पडतं? जाणून घ्या सविस्तर....
कोरोना झाल्यानंतर (Post Covid 19) नवनवे साईड इफेक्टस समोर येतायत.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : कोरोना झाल्यानंतर काय होईल याचा काय नेम नाय. कोरोना झाल्यानंतर (Post Covid 19) नवनवे साईड इफेक्टस समोर येतायत. आता तर कोरोनानंतर टक्कल पडण्याची भीती आहे कोरोना एकदा का शरीरात शिरला की तो काय करेल, याचा नेम नाही. आता कोरोनाचा आणखी एक नवा दुष्परिणाम समोर आलाय. कोरोना तुम्हाला टक्कल पाडतोय. कोरोना होऊन गेल्यावर केस गळत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. (new side effect of covid 19, Hair loss problems after pre corona)
कोरोना होऊ गेल्यावर रुग्णांना थकवा, खोकला, श्वास घ्यायला त्रास, वास न येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामध्ये भर पडलीय ती केस गळतीची. कोरोना होऊन गेल्यावर केस जात असल्याचीही काही रुग्णांची तक्रार आहे.
कोरोनानंतर केस गळण्याच्या आणि टक्कल पडण्याच्या तक्रारी तुलनेनं कमी आहेत. पण तरीही तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर केसांची निगा राखणा-या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.