सोल: उत्तर कोरियाने आपल्या बदलत्या दृष्टीकोणासोबत एक पाऊल पुढे टाकले आहे. आता उत्तर कोरियांतील सर्व घड्याळे ही आर्धा तास पुढे धावून दक्षिण कोरियासोबत अचूक वेळ साधणार आहेत. त्याचे झाले आहे असे की, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबत आपली समयनिश्चिती (टाईम झोन सेट) केली आहे. त्यामुळे उत्तर कोरियातील नागरिकांना आपली घड्याळातील वेळ अर्ध्या तासाने पुडे सरकवावी लागणार आहे उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली. गेल्याच आठवड्यात दोन्ही कोरियांमध्ये एक शिखर बैठक पार पडली या बैठकीनंतर उत्तर कोरियाने हा निर्णय घेतला आहे.


शिखर बैठकीनंतर देशाचा निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था केसीएनएने म्हटले आहे की, 'ऐतिहासिक ठरलेल्या उत्तर-दक्षिण शिखर बैठकीनंतर उभय देशांतील वेळ पुन्हा एकदा अचूक आणि निश्चित करणे हे एक व्यवहारिक निर्णय आहे.' दरम्यान, या निर्णयामुळे उत्तर आणि दक्षिण कोरिया पुन्हा एकत्र येऊ शकता, अशी शक्यता निर्माण झाली आहे.


अमेरिका सैन्य घेणार मागे


दरम्यान, उत्तर आणि दक्षिण कोरियात सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होत असल्याने अमेरिकेनेही त्या परिसरातील आपले सैन्य काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांनी पेंटॅगॉनला आदेश दिला आहे की, त्यांनी दक्षिण अफ्रिकेत असलेले अमेरिकेचे सैन्य परत बोलवण्यासाठी पर्याय तयार करा. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई-इन यांच्यात एक ऐतिहासिक बैठक झाली. न्यू यॉर्क टाईन्सने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या निर्णयाची माहिती देणाऱ्या अनेक लोकांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे.