सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या `या` वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...
Ryugyong Hotel: 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या या हॉटेलने उंचीचे रेकॉर्ड तोडले नाही पण जगभरात आपली छाप पाडण्यात यश मिळवले. ज्यामध्ये 105 खोल्या आहेत परंतु आजपर्यंत कोणीही येथे थांबलेले नाही.
Ryugyong Hotel Facts: उत्तर कोरिया हा प्रसिद्ध देश नेहमीच अनेक कारणामुळे चर्चेत असतोच. तिकडच्या अनोख्या कायद्यांसाठी आणि क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी ते ओळखले जाते. एवढंच नाही तर सध्या उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये असलेली एक रहस्यमय इमारत देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे पिरॅमिडल गगनचुंबी इमारत, ज्याला रयुगयोंग (Ryugyong) किंवा यू-क्यूंग (Yu-kyung Hotel) म्हणूनही ओळखले जाते. या हॉटेलचे वगेळेच रहस्य आहे. हे एक असे हॉटेल आहे जिथे आजवर कोणीही राहिले नाही. चला या प्रसिद्ध हॉटेमध्ये आजवर (Why Ryugyong Hotel Is Abandoned) कोणी का राहील नाही हे जाणून घेऊयात.
105 खोल्या असलेलं रहस्यमय हॉटेल
रयुगयोंग हे 330 मीटर उंचीचे हॉटेल आहे जे बाहेरून फारच आकर्षक दिसते. या हॉटेलमध्ये 105 रूम्स आहेत. परंतु, आजपर्यंत एकही पाहुणे या हॉटेलमध्ये राहिलेला नाही. लोक या निर्जन इमारतीला 'कर्स्ड हॉटेल' किंवा 'झपाटलेले हॉटेल' म्हणतात. याशिवाय त्याला '105 बिल्डिंग' असेही म्हणतात. काही वर्षांपूर्वी, अमेरिकन निमॅगझीनने त्याला 'मानवी इतिहासातील सर्वात वाईट इमारत' म्हणून रेट केले होते. या हॉटेलबद्दल अनेक विचित्र कथा प्रचलित आहेत, ज्यामुळे ते आणखीनच रहस्यमय झाले आहे.
हे ही वाचा: धार्मिकतेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष, तडफडून झाला मृत्यू
आहे जगातील सर्वात उंच हॉटेल
तब्बल 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेले हे हॉटेल उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार होता. त्या वेळी देशाच्या एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के वाटा होता. जगातील सर्वात उंच हॉटेल बनण्याचे स्वप्न पाहणारा हा प्रकल्प आजही अपूर्णच आहे. आज जगातील सर्वात उंच वीरान इमारत म्हणून हे हॉटेल प्रसिद्ध झाले आहे. या अनोख्या विक्रमासाठी रयुगयोंग हॉटेलला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर ती जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत ठरली असती आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनू शकली असती.
हे ही वाचा: भारतात डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे? वापर करा को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा, 'ही' ठिकाणं ठरतील बजेटमध्ये
बांधकामात करताना आले अनेक अडथळे
या हॉटेलचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले. त्यावेळी याचे बांधकाम दोन वर्षांत तयार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र बांधकाम सुरू असताना बांधकाम साहित्याचा तुटवडा, बांधकामासंबंधी तांत्रिक अडचणी अशा अनेक समस्या समोर आल्या. या समस्यांमुळे याचे बांधकामे वारंवार थांबत राहिली. सन 1992 मध्ये उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने बांधकाम पूर्ण ठप्प झाले. मात्र, 2008 मध्ये पुन्हा बांधकाम सुरू झाले.
हे ही वाचा: हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन
आजही बांधकाम अपूर्ण
2012 मध्ये उत्तर कोरियाच्या सरकारने या हॉटेलचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्याचा दावा केला होता. मात्र, अनेक वेळा तारखा बदलूनही हे हॉटेल आजतागायत अपूर्णच आहे. बांधकामाच्या कामात वारंवार अडथळे येत असल्याने प्रकल्प अपूर्णच राहिल्याचे दिसून येत आहे.