Destination Wedding: डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड अजूनही कायम आहे. सुंदर ठिकाणी जाणून आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा इव्हेंट करण्याची अनेकांची ईच्छा असते. पण ही ईच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बजेटही मोठं ठेवावं लागतं. पण आज आम्ही तुम्हाला स्मार्ट टिप्स देणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा वापर करायचा आहे.
अशी क्रेडिट कार्डे (Credit Cards) विशिष्ट ब्रँड लक्षात घेऊन बनवली जातात. जे विशिष्ट ब्रँडकडून खरेदीवर जास्त सूट देतात त्यांना को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Co Branded Credit Cards) म्हणतात. या कार्ड्सद्वारे अनेक विशेष सवलती, रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक मिळू शकतात. या कार्ड्सद्वारे, सणासुदीच्या काळात मोठ्या सवलती मिळतात आणि ग्राहकांना लॉयल्टीचे फायदे देखील मिळू शकतात.
हे ही वाचा: 2023 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट.. 200 कोटींपैकी केली केवळ 13 कोटींची कमाई, रेटिंग फक्त 2.7
देखणी वास्तुरचना आणि शांत तलावाशेजारच्या दृश्यांसह लवासा हे युरोपियन शहरासारखे आहे. तुमच्या स्वप्नातील सुंदर लग्नासाठी योग्य असलेले हे ठिकाण त्याच्या देखणेपणासाठी ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही ईएमआय पर्यायासह क्रेडिट कार्डने पैसे भरू शकता आणि तुमचा खर्च अगदी सहजपणे मॅनेज होईल. त्यामुळे कोणताही ताण न घेता तुम्ही लग्नाचा दिवस आनंदाने साजरा करू शकता.
तुमच्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा वापर करून तुमच्या फ्लाइट बुक करा आणि क्वीन ऑफ हिल्स असलेल्या मसूरीमध्ये तुमचे स्वप्नातले लग्न करा. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वतरांगा आणि हिरव्यागार जंगलांमध्ये, देखण्या ब्रिटिशकालीन वास्तूरचना आणि ताजेतवाने करणारी हवा तुम्हाला डेस्टिनेशन हिल वेडिंगसाठी उत्तम ठरेल.
हे ही वाचा: 2024 चा 'तो' ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याने बॉक्स ऑफिसवर मिळवला प्रचंड नफा; आता चीनमध्ये रुचणार इतिहास
किल्ल्यांचे पुरातन शहर आणि प्रेमकथेसाठी ओळखल्या जाणाऱ्या जहाजमहालामुळे मांडू हे भल्या मोठ्या कार्यक्रमांसह लग्नासाठी उत्तम ठिकाण ठरते. इथल्या स्थानिक फ्लेवर्स आणि भव्य वास्तू तुमच्या लग्नाच्या आनंदात भर घालतील. विविध हॉटेल्समध्ये क्रेडिट कार्डस् स्वीकारली जातात. त्यामुळे मांडू हे तुमच्या लग्नासाठी उत्तम आणि खिशाला परवडणारे स्थान ठरते.
अत्यंत सुंदर बीच बेडिंग हवे असलेल्या लोकांसाठी लक्षद्वीप हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. इथल्या लगून्स स्वच्छ आणि देखण्या आहेत, बीच सुंदर आहेत आणि किनारपट्टीवर पामच्या रांगा आहेत. त्यामुळे निळेशार पाणी आणि सोनेरी वाळूच्या सोबतीने आपली लग्नगाठ बांधायला तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून हॉटेल बुकिंग्सवर सर्वोत्तम डील्स मिळवा आणि बेटांवरील लग्नाचे बुकिंग सोपे करा.
हे ही वाचा: PHOTO: चीननंतर भारतातील 'या' किल्ल्याची आहे सर्वात लांब भिंत, 500 वर्षांपूर्वी बांधला गेला होता किल्ला
एक ऐतिहासिक आणि देखणे स्थान असलेल्या हम्पीमध्ये आपल्याला उज्ज्वल साम्राज्याचा इतिहास पाहता येतो. इथे सुंदर इमारती, पुरातन मंदिरे आणि देखणे बोल्डर्स आहेत. नैसर्गिक सौंदर्य आणि वास्तुरचनात्मक भव्यता यांच्यामुळे तुम्हाला कालातीत प्रेमाचा अनुभव घेता येईल. तुम्हाला शेवटच्या क्षणाच्या काही गरजा पूर्ण करायच्या असतील तर तुमचे डेबिट कार्डदेखील हातात ठेवा.
स्मार्ट नियोजन आणि आपल्या खर्चाच्या व्यवस्थापनासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यामुळे ही सुंदर ठिकाणे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा अनुभव साकार करू शकतात.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.