फ्रान्स : जर्मनीतील अणू ऊर्जा प्रकल्प नष्ट करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी कुठलाही स्फोट करण्यात आला नाही. एका रोबोच्या मदतीने तो अख्खा ढाचा पाडण्यात आला. एखाद्या पत्त्याप्रमाणे हा प्रकल्प कोसळला. १९८०मध्ये हा प्रकल्प भूकंपाचा धोका असल्यानं बंद करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनीत र्‍हाईन नदीलगतच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा कूलिंग टॉवर पाडण्यात आला. या प्रकल्पातून वीज निर्मिती करण्याचे थांबविण्यात आले होते. एका रिमोट कंट्रोलच्यामदतीने प्रकल्प टॉवरला आधार देणारे खांब काढण्यात आले. त्यानंतर खास बनविलेल्या रोबोच्यामदतीने प्रकल्पाचा ढाचा पाडण्याता आला.


यावेळी प्रचंड धूळीचे ढग दिसून आले आणि पूर्ण प्रकल्प खाली कोसळला. हा बंद असलेल्या प्रकल्प पाडण्यासाठी प्रदीर्घ कायदेशील लढाई लढली गेली. त्यानंतर २००४ मध्ये हा प्रकल्प पाडण्याचे ठरविले गेले.