Nuclear Fusion Breakthrough : अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉरेन्स नॅशनल लॅबोरेटरीतल्या वैज्ञानिकांनी एक असा पराक्रम करुन दाखवलाय. ज्यामुळे सारं जग बदलणार आहे. या लॅबमध्ये न्यूक्लिअर फ्यूजनचा प्रयोग यशस्वी झालाय ज्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसला पर्याय ठरेल अशी ऊर्जानिर्मिती होणार आहे. ही ऊर्जानिर्मिती करताना कार्बनचा धोका नसेल त्यामुळे पूर्णपणे शुद्ध ऊर्जा माणसाला मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडक्यात जे कार्य अणुकेंद्रांमध्ये होतं तेच कार्य लॅबमध्ये झालंय. आणि तेही जल किंवा वायू प्रदूषण न होता. एका कृत्रिम सूर्यामुळे हे सारं काही शक्य झालंय. या कृत्रिम सूर्यामुळे जी ऊर्जानिर्मिती होईल त्यामुळे जग कसं बदलणार आहे, पाहुयात.. 


'कृत्रिम सूर्या'मुळे काय होईल? 


  • अणू केंद्रक संयोगात वाफेवर टर्बाईन्स चालवून वीजनिर्मिती केली जाईल

  • कार्बनमुक्त, जल आणि वायू प्रदूषणमुक्त ऊर्जानिर्मिती शक्य

  • केवळ एक ग्लास पाण्यातून वर्षभर पुरेल इतकी वीजनिर्मिती

  • गॅस, पेट्रोल, डिझेल यासारख्या पारंपरिक ऊर्जेला पर्याय

  • अणू केंद्रामुळे होणारी रेडिओअॅक्टीव्ह कचरानिर्मिती कृत्रिम सूर्यामुळे होणार नाही

  • मुबलक ऊर्जानिर्मितीमुळे ऊर्जा संकट आणि वायू-जल प्रदूषणाला कायमचा आळा



न्यूक्लिअर फ्यूजनच्या यशस्वी प्रयोगामुळे शुद्ध आणि मानवनिर्मित ऊर्जेचा पर्याय खुला झाला आहे. मात्र औद्योगिक आणि दैनंदिन जीवनात अशी ऊर्जा प्रत्यक्षात वापरण्यासाठी अजून 20-30 वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय. अशा शुद्ध ऊर्जेवर संशोधन यशस्वी झालं हेदेखील फार महत्त्वाचं मानलं जातंय.