Optical Illusion: लहानपणी आपणही कित्येकदा कोडी, पझल्स (Puzzles) यांच्या विश्वात रमलो असूच. आताही अनेक प्रकारची कोडी आणि पझल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजही आपल्याला असे अनेक पझल्स कायमच आकर्षित करतात. सध्या असाच एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या चित्रात तुम्हाला एक गारूडी दिसेल. जो आपल्या टोपलीतून एक साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु साप तिथं नाहीये तुम्हाला माहितीये का की तो कुठे आहे? (optical illusion can you spot hidden snake in picture)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यापैकी काही ऑप्टिकल इल्यूझन (Optical Illusion) आहेत. ही इल्यूझन्स पाहून आपल्याला अनेकदा वाटतं असतं की आपण जे पाहतोय तेच खरं आहे. परंतु अनेकदा आपण फसतो. आपल्याला कळतच नाही असं का होतं. पण हा मेंदू आणि डोळ्यांचा खेळ आहे. तेव्हा जाणून घेऊया या फोटोत लपलेला साप नक्की तुमच्या डोळ्यांना दिसतोय तिथेच आहे की आणखी कुठे? 


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?


ऑप्टिकल इल्यूझन तुम्हाला तुमच्या मेंदूला चालना देतात कारण यामुळे तुमचे निरिक्षण कौशल्य वाढते. इतकंच नाही तर ऑप्टिकल इल्जूझन शास्त्रज्ञांना आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यास मदत करतो. या फोटोत तुम्ही पाहू शकता की एक गारूडी येथे सापाशी खेळतो आहे पण तुम्हाला साप मात्र काही दिसत नाहीये, पण काळजी करू नका साप तिकडेच आहे पण तो तुम्हाला चातुर्यानं शोधवा लागणार आहे. साप शोधा आणि तो कुठे आहे ते सांगा. 


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


या चित्राची गंमत म्हणजे साप अजिबात दिसत नाही. यामुळे हा साप सहजासहजी दिसणार नाही. पण जर तो तुम्हाला सापडला तर तो तुमच्यासारखं हुशार आणि जिनियस कोणी नाही. पण तो साप कुठे आहे याची आता आम्ही तुम्हाला आयडिया देतोय. हा साप गारूडीच्या हातावर आहे. तेव्हा तुम्हाला दिसेल की तो त्याच्या डाव्या हाताच्या भागावर आहे.