नवी दिल्ली : पाकिस्तान लष्कराने पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तान सरकारच्या उलट्या बोंबा पाहायला मिळत आहे. पुलवामाबाबत भारताकडून आरोप करण्यात येतोय पण निवडणूकांच्या तोंडावर भारतात हल्ले वाढतात. यामध्ये पाकिस्तानचा संबंध नसल्याचे पाकिस्तानचे मेजर जनरल हासिफ गफूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  इराण, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे धागेदोरे सापडत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. दहशतवादाशी लढण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरले आहे. हे एव्हाना जगालाही कळले आहे. या सर्वामुळे पाकिस्तान काळ्या यादीत जाण्याच्या मार्गावर आहे. असे होऊ नये यासाठी पाकिस्तान बचावात्मक पावित्रा घेताना दिसत आहे. पाकिस्तान जर काळ्या यादीत गेले तर त्यांना मिळणारी मदत बंद होऊ शकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकाराच्या प्रश्नांची उत्तरं देताना अणुबॉम्बविषयीच्या प्रश्नांनान उत्तरं दिली.  अणवस्त्रांचा वापर आणि त्याविषयीचा निर्णय सोपा नाही. हे एक राजकीय शस्त्र आहे. त्यामुळे हा कठीण निर्णय आहे. तुमच्याकडे कोणतं शस्त्र आहे तो महत्त्वाचं नाही तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा असल्याचे यावेळी गफूर म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात लढत असतो पण भारतातर्फे त्याला नेहमी विरोध करतो. पाकिस्तानला नेहमी शांतताच हवी आहे.  विचार न करता भारताकडून आमच्यावर आरोप होत असल्याचे सांगण्यात आले. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान खोटे दावे करत असल्याचे या पत्रकार परिषदेतून समोर येत आहे.  भारतानंच वेळोवेळी पाकिस्तानवर हल्ला केल्याचे पाकिस्तान लष्कराने म्हटले आहे. पाकिस्तानात शांतता असताना भारतावर हल्ला होतो असा खोटा दावा पाकतर्फे करण्यात आला आहे. 


एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक पाकिस्तानातून नेण्यात आली नव्हती. हल्ल्यासाठी वापरलेली गाडी पाकिस्तानची नव्हती. हल्ला करणारा स्थानिक भारतीय होता असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.  पाकिस्तान बदलतो. पाकिस्तानात नवा विचार येतोय. जबाबदारी झटकण्याचा पाकिस्तानातून प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानात गुंतवणूक येतेय, पाकिस्तान बदलतोय त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे हल्ले करणार नाहीत. पण पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल असेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताकडूनच युद्धाची धमकी येत असल्याचे गफूर यांनी यावेळी सांगितले.