इस्लामाबाद :  मीम्समध्ये कायम दिसणारे आमिर लियाकत (Aamir Liyakat Death) यांचं निधन झालं आहे. पाकिस्तानचे खासदार अमीर लियाकत हे 49 वर्षांचे होते. ते पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही होस्ट राहिले आहेत. (pakistani anchor former mp and famous meme face amir liyaqat died at age of 49)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर लियाकत भारतातही खूप लोकप्रिय राहिले. ते अनेकदा मीम्समध्ये दिसले. आमिर त्यांच्या टाळी देण्याच्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध होते. आमिरने याआधी होस्ट म्हणून आपली छाप पाडली होती. आमिरने 2001 मध्ये जिओ टीव्हीमध्ये रुजु झाले. तेथे त्यांच्याकडे अलीम ऑनलाइन (Aalim Online) या धार्मिक कार्यक्रमाची जबाबादारी होते. या काळात त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.


आमिर गेल्या काही वर्षांपासून जिओ टीव्ही (Geo TV) आणि बोल न्यूजसाठी (Bol News) रमजान ट्रान्समिशन होस्ट करत होते. आमिर अखेरीस 'बोल हाउस' नावाच्या शोमध्ये होस्टच्या भूमिकेत दिसले होते.


कोण होते आमिर लियाकत? (Who Is Amir Liaquat)


आमिर लियाकत (Amir Liaquat Profile) हा पाकिस्तानमधील प्रसिद्ध निवेदक होते. आमिर यांनी 2018 मध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयमध्ये प्रवेश केला. यानंतर ते कराचीमधून खासदार म्हणून निवडून आले. मात्र, नंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पीटीआयमध्ये येण्यापूर्वी ते मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (MQM) चे मोठे नेते होते.


सोशल मीडिया


आमिर लियाकत सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे 6 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तसेच ट्विटरवर त्याचे 1.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.