Pakistani Father Burned His Son: वर्गात गृहपाठ पुर्ण केल्यामुळे जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) कराची (Karachi) शहरात घडली. आपल्या अल्पवयीन मुलाला पेटवून दिल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, रईस अमरोवी कॉलनीत आरोपी वडील नजीर याने 12 वर्षीय मुलगा शाहीर याच्या अंगावर रॉकेल (kerosene)  ओतून पेटवून दिल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली.  (Pakistani Father Burned His Son sc)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तानुसार, आरोपीला सोमवारी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीच्या तपासणीदरम्यान आरोपी नजीरने तपासकर्त्यांना सांगितले की, त्याचा आपल्या मुलाची हत्या करण्याचा हेतू नव्हता. मुलाचा शाळेचा गृहपाठ (home work) होत नसल्यामुळे त्याला घाबरवण्यासाठी त्याने अंगावर रॉकेल (kerosene) शिंपडल्याचे आरोपीने सांगितले. आरोपीने सांगितले की, मुलाला घाबरवण्यासाठी त्याने मॅच पेटवली होती पण तेलाने पेट घेतला आणि मुलगा भाजला.


पोलिसांनी सांगितले की, मुलगा गंभीर भाजल्यानंतर त्याला जवळच्या सिंध (sindh government hospital) सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला कराची येथील डॉ. रुथ केएम फाऊ सिव्हिल हॉस्पिटल (CHK) च्या बर्न सेंटरमध्ये पाठवण्यात आले. बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान शाहीरचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृताच्या आईच्या तक्रारीवरून वडिलांना अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, याआधी पतीसोबत झालेल्या भांडणातून मानसिकदृष्ट्या त्रासलेल्या आईने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाला पेटवून दिल्याची घटना घडली होती. यामध्ये लगा 50 टक्के भाजला होता. त्याला प्रथम पायल रुग्णालयात नेण्यात आले तेथून त्याला पीजीआय चंदीगडमध्ये रेफर करण्यात आले. मुलाच्या आजीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आईविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.   


वाचा : Facebook Post करत असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा होऊ शकते जेलवारी, पाहा डिटेल्स


प्रश्नांची नीट उत्तरे न मिळाल्याने वडील संतापले


स्थानिक मीडियानुसार, पोलीस अधिकारी सलीम खान यांनी सांगितले की, शाहीरने गृहपाठ पूर्ण करण्याऐवजी पतंग उडवायला बाहेर जाण्याचा आग्रह केल्याने त्याचे वडील नजीर संतापले. नजीरने आपल्या मुलाला गृहपाठाशी संबंधित प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शाहीरला प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्याच्या वडिलांनी त्याच्या अंगावर रॉकेल ओतले.