कराची : पाकिस्तानची (Pakistan) अरिश फातिमा (Arish Fatima) अवघ्या चार वर्षांची आहे, परंतु या कमी वयात तिने एक उत्तम काम केले आहे. सर्वात कमी वयातील मायक्रोसॉफ्ट व्यावसायिक बनून फातिमाने इतिहास रचला आहे. पाकिस्तान सरकारने शुक्रवारी ट्विटरवर करुन ही माहिती दिली आहे. सरकारच्यावतीने ट्टिट करताना म्हटले आहे,  मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड प्रोफेशनल(Microsoft Certified Professional- MCP) परीक्षेत चार वर्षीय अरिश फातिमाने 831 गुण मिळवले आहेत. फातिमाच्या या कर्तृत्वावर त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.


जागतिक विक्रमही मोडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ टीव्हीच्या अहवालानुसार एमसीपीची (MCP) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 700 गुण आवश्यक आहेत, तर अरिशने 831 गुण मिळवून यश संपादन केले. अशा प्रकारे तिने जागतिक विक्रम मोडला आणि पाकिस्तानची मान जगभर अभिमानाने उंचावली आहे. अरिश फातिमा (Arish Fatima) हिचे कौतुक करीत पाकिस्तान सरकारने तिला देशाला याचा अभिमान असल्याचे वर्णन केले आहे.


फातिमाची विलक्षण बुद्धीमता


अरिशच्या वडिलांनी सांगितले की, कोरोनाव्हायरस (Coronavirus)लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान घराबाहेर काम करत असतांना त्यांनी आपल्या मुलीला आयटीमध्ये रस असल्याचे समजले आणि त्यांनी तिला या परीक्षेत  मदत केली. अरिशचे वडील ओसामा देखील आयटी तज्ज्ञ आहेत आणि आपली मुलगी या क्षेत्रात चमत्कार करताना पाहू इच्छित आहेत. अरिशचे पालक सांगतात की त्यांची मुलगी खूपच हुशार आणि विलक्षण बुद्धीमता लाभलेली आहे.