Breast Milk: बॉडीबिल्डर्स विकत घेताहेत `आईचं दूध`! जाणून घ्या यामागचं कारण
Breast Milk For Bodybuilding: सोशल मीडियावर ब्रेस्ट मिल्कबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे दूध बॉडीबिल्डर्ससाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Bodybuilders Women Breast Milk Benefits: बाळाच्या जन्मानंतर आईचं दूध खूप महत्त्वाचं असतं. सहा महिने तरी बाळाला दूध पाजणं आवश्यक असतं. कारण आईच्या दुधात रोगप्रतिकारशक्ती असते. आईचं दूध बाळासाठी आरोग्यवर्धक असतं. त्यावरून आईच्या दुधाची किंमत किती आहे हे कळतं. मात्र गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक महिला आपलं दूध एक बॉडीबिल्डरला विकत आहे. त्यामुळे आईच्या दुधाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. खरंच आईच्या दुधामुळे बॉडीबिल्डर्संना फायदा होतो? असा प्रश्न विचारला जात आहे. टिकटॉकवर डेब्रिटो नावाच्या महिलेनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिने दावा केला आहे की, 'मी आपलं ब्रेस्ट मिल्क लोकांना विकते.' या दुधातून तिने 10 लाख रुपयांहून अधिक कमावले आहेत. तिने एका पाउचमध्ये आपलं ब्रेस्ट मिल्क घेऊन दाखवलं आहे. या दुधाला लिक्विड गोल्ड असं नाव दिलं आहे. या व्हिडीओखाली लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
आईच्या दुधाबाबत काय आहे तज्ज्ञांचं मत?
आईचं दूध प्यायल्याने फायदा मिळतो आणि लोकं आपली मजबूत शरीरयष्टी बनवत आहेत. दूध मसलसाठी फायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या मते या फक्त वरवरच्या बातम्या असल्याचं मत आहे. आईचं दूध बाळाच्या विकासासाठी आरोग्यवर्धक आहे. मात्र मोठ्या लोकांना त्याचा फायदा मिळतो असा कुठेच उल्लेख किंवा पुरावा नाही.
बातमी वाचा: Home Loan घ्यायचं आहे का? फ्लोटिंग रेट आणि फिक्स रेटमधील फरक समजून घ्या
ब्रेस्ट मिल्क किती काळ टिकतं?
तज्ज्ञांच्या मते, ब्रेस्ट मिल्क काढल्यानंतर जवळपास 8 दिवस फ्रिजमध्ये स्टोर केलं जाऊ शकतं. पण चार दिवसातच दुधाचा वापर केला पाहीजे. त्याचबरोबर दूध फ्रिजमध्ये 0 ते 3.8 सेल्सियसवर स्टोर केलं पाहीजे. रुम टेम्प्रेचर 25 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी असेल तर चार तासात दुधाचा वापर करणं आवश्यक आहे.
ब्रेस्ट मिल्कमध्ये मायक्रोप्लास्टिक
इटलीत नुकतंच आईच्या दुधावर एक रिसर्च करण्यात आला होता. यात 34 महिलांचे ब्रेस्ट मिल्क सँपल घेण्यात आले होते. त्यापैकी 75 टक्के दुधात मायक्रोप्लास्टिक मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे असं दूध बाळाला हानिकारक होऊ शकतं. गरजेपेक्षा जास्त प्लास्टिकचा वापर होत असल्याने मायक्रोप्लास्टीक मिळत असल्याचं दावा करण्यात आला आहे.