Home Loan घ्यायचं आहे का? फ्लोटिंग रेट आणि फिक्स रेटमधील फरक समजून घ्या

Home Loan Interest: बँकेकडून होम घेण्यापूर्वी व्याजदराबाबत माहिती असणं आवश्यक आहे. कारण दोन पर्याय आपल्यासमोर असतात. त्यापैकी एक निवडणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

Updated: Nov 17, 2022, 09:30 PM IST
Home Loan घ्यायचं आहे का? फ्लोटिंग रेट आणि फिक्स रेटमधील फरक समजून घ्या title=

Home Loan Floating Rate Vs Fixed Rate Difference: आपलं स्वत:चं घरं असावं अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी दिवसरात्र मेहनत करून एक एक पैसा जोडला जातो. मात्र इतकं करूनही स्वप्नातलं घर घेणं कठीण होतं. त्यामुळे होम लोन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे बँकेच्या चकरा मारून होम लोनबाबत चौकशी करतो. बँक आपला रेकॉर्ड पाहून कर्ज द्यायचं की नाही हा निर्णय घेतं. मात्र बँकेकडून कर्ज घेताना इंटरेस्ट रेट महत्त्वाचा असतो. बँका तुम्हाला कोणत्या दराने होम लोन देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. साधारणपणे, होम लोनचे व्याजदर दोन श्रेणींमध्ये विभागले जाते. पहिलं म्हणजे फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि दुसरं फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असतो. फिक्स्ड इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज घेताना एक व्याजदर निश्चित असतो. त्याच दराने तुम्हाला कर्जाची परफेड करावी लागेल. दुसरीकडे, फ्लोटिंग इंटरेस्ट रेट बाजारानुसार बदलत असतो. हा बदल प्रिसिंपल अमाउंटवर अवलंबून असतो. सरकार आणि आरबीआय वेळोवेळी व्याजदर बदलत असतात. त्यावर हा दर निश्चित होत असतो.

Fixed Rate Of Interest: होम लोनच्या व्याजदरांवर बाजारातील बदलत्या परिस्थितीचा आणि चढउतारांचा परिणाम होत नाही. होम लोनवरील फिक्स्ड इंटरेस्ट रेट म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना निवडलेल्या व्याजदरांवरच कर्जाची परतफेड करावी लागेल. एका ठरावीक वेळेनंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की व्याजदर कमी होणार नाही. तर तुम्ही फिक्स्ड इंटरेस्ट रेटचा पर्याय निवडू शकता. एकंदरीत, जर तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही निश्चित व्याज निवडू शकता.

बातमी वाचा: SBI खातेदारांसाठी खूशखबर! आता WhatsApp वरून करू शकता ही कामं

Floating Rate Of Interest: बाजारातील बदलानुसार जो व्याजदर बदलतो त्याला फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणतात. गृहकर्जावरील फ्लोटिंग व्याजदर बँक किंवा इतर वित्तीय संस्थांद्वारे ऑफर केलेल्या मूळ दरावर अवलंबून असतो. जेव्हा जेव्हा बेस रेटमध्ये बदल होतो तेव्हा हे व्याज दर खाली वर होतात. उदाहरणार्थ, रेपो दरात वाढ झाल्यास व्याजदर वाढतील. रेपो दरात घट झाल्यास या व्याजदराचा फायदाही चांगला होतो.