श्‍यामन : चीनच्या श्यामन शहरात ९व्या ब्रिक्स  शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी सुरेक्षेचा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधानांच्या भाषणाआधी सकाळी ८ वाजता इंटरनॅशनल कॉन्फ्रेन्स सेंटर येथे पोहोचलेल्या पंतप्रधानांचं स्वागत चीनचे राष्ट्रपती शे जिनपिंग यांनी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिक्स संमेलनात बोलताना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले की, ‘बदलत्या परिस्थीतीत ब्रिक्स(ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) ची महत्वाची भूमिका आहे. ब्रिक्स देशांसाठी चीनकडे अनेक मुख्य योजना आहेत. विकासासाठी ऎकमेकांच्या सहयोगाची गरज आहे. 


त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘ब्रिक्सच्या नव्या बॅंकांमुळे सर्वच सदस्य देशांना मोठा फायदा होणार आहे. शांति आणि विकासासाठी ऎकमेकांच्या सहयोगाची गरज आहे. हिंदुस्थानाती तरूण आमच्या देशाची मोठी ताकद आहेत. गरीबी विरोधात लढण्यासोबत भारत स्वच्छता अभियानही चालवत आहे’.


मोदींच्या भाषणातील १० मुद्दे -


- भारतातील ८० कोटी तरूण आमच्या देशाची ताकद
- आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता आमचं लक्ष्य
- सुरक्षेच्या मुद्द्यावर मोदींचं भाष्य
- विकासासाठी ब्रिक्स बॅंकेकडून कर्ज देणे सुरू
- शांति आणि विकासासाठी ऎकमेकांचा सहायोग आवश्यक
- गरिबी कमी करण्यासोबतच स्वच्छता अभियान
- ब्रिक्समधी पाचही देश समान स्तरावर 
- डिजिटल क्रांतीने विकासावर भर दिला जातोय