अबू धाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यू ए ईतल्या अबू धाबीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. अबू धाबीचे राजे मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी स्वतः मोदींचं विमानतळावर स्वागत केलं. 


राजकीय, आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींच्या दोन दिवसांच्या यूएई दौ-यात उभय देशांतले राजकीय, आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी विविध करारांवर स्वाक्ष-या केल्या जाणार आहेत. 


मंदिराचा भूमीपूजन सोहळा


अबू धाबीमध्ये मंदिराचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर, नरेंद्र मोदी दुबईत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटला संबोधित करतील. त्यानंतर यू ए ई हून मोदी ओमानला रवाना होतील.