मुंबई : जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण इटलीला कुलुपबंद करण्यात आलं आहे. इटलीमध्ये फक्त खाण्याची दुकानं मेडिकल स्टोअर उघडी ठेवण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना पॉर्नहब या वेबसाईटने इटलीमध्ये फ्री सबस्क्रिप्शन द्यायचा निर्णय घेतला आहे. पॉर्नहबच्या इटलीमधल्या ग्राहकांना एका महिन्यासाठी हे सबस्क्रिप्शन फ्री मिळेल. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून पॉर्नहब या वेबसाईटने हे पाऊल उचललं आहे.



महिन्याभराच्या फ्री सबस्क्रिप्शनशिवाय पॉर्नहब त्यांच्या मॉडेलहबमधून मार्च महिन्यात झालेली कमाई इटलीला मदत म्हणून देणार आहे. तसंच पॉर्नहबच्या प्रिमियम सबस्क्रिप्शनलाही क्रेडिट कार्ड द्यावं लागणार नसल्याचं वेबसाईटने स्पष्ट केलं आहे.