नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने 1950 मध्ये प्रथम इस्रायलला मान्यता दिली होती पण दोन्ही देशांतील कुटनीती संबंधांची औपचारिक सुरुवात 1992 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी केली होती. 2003 मध्ये जसवंत सिंह प्रथम परराष्ट्र मंत्री होते, ज्यांनी इस्रायलचा दौरा केला होता. त्यानंतर राष्ट्रापती प्रणब मुखर्जी इस्राईलला गेले होते. प्रथमच भारतीय पंतप्रधानांचं इस्राईलमध्ये भव्य स्वागत होणार आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प हे जेव्हा इस्राईलच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंझिन नेतन्याहू स्वतः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना घेण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते. तसेच जेव्हा ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरु पोप इस्राईलला जातात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी इस्राईलचे पंतप्रधान विमानतळावर उपस्थित राहतात.