कतार : Qatari Princess Kasia Gallanio death case : कतारचा प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलीफा अल थानी (Abdelaziz bin Khalifa Al-Thani) याची एक्स पत्नी कासिया गॅलानियो हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. (Ex-Qatar Princess found dead in Spain home) अलीकडे तिने आरोप केला होता की, आधीच्या पतीने एका अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतारचे राजकुमार अब्दुल अझीझ बिन खलिफा अल-थानी यांची तिसरी पत्नी कासिया गॅलानियो, तिच्या स्पेनच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. (Ex-Qatar Princess found dead in Spain home:) हायप्रोफाईल प्रकरण असल्याने पोलीस आता या प्रकरणाचा अनेक बाजूंनी तपास करत आहेत.


राजकुमारीच्या मृत्यूचे हे कारण


फ्रेंच वृत्तपत्र Le Parisien मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गलानिओचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाला. त्याचवेळी कासियाच्या संशयास्पद मृत्यूच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कासिया 45 वर्षांची होती, तिच्यावर तिच्या माजी पतीकडून मुलांचा ताबा घेण्याचा खटला सुरु होता. अब्दुल अजीज बिन खलिफा अल थानी हे अमीराचे काका आहेत.


कुटुंबीयांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने बराच वेळ फोन उचलला नाही, तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर पोलिसांचे पथक  मार्बेला येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले तेव्हा कासिया हिचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, 'प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण ड्रग्जचे अतिसेवन असल्याचे दिसते. शवविच्छेदनानंतरच अधिक काही स्पष्ट होईल.


माजी पतीवर आरोप  


कासिया हिचा मृत्यू अशा वेळी झाला जेव्हा तिने अलीकडेच तिच्या माजी पतीवर एका अल्पवयीन मुलाला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला. मात्र, प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलिफा यांनी हा आरोप निराधार आणि खोटा असल्याचे  सांगत फेटाळला होता. कासिया हिला 17 वर्षांच्या दोन जुळ्या मुली आहेत. पूर्वी त्यांच्या मुली त्यांच्या वडिलांच्या घरी राहत होत्या पण नंतर त्या आपल्या आईकडे आल्या.