धक्कादायक! 235 फूट ऊंचावर उलटी अडकली रोलरकोस्टर राईड आणि...
रोलरकोस्टर राइड्स नेहमीच मजेदार असतात. आपल्यापैकी अनेकांनी त्याची मजा घेतली असेल.
मुंबई : रोलरकोस्टर राइड्स नेहमीच मजेदार असतात. आपल्यापैकी अनेकांनी त्याची मजा घेतली असेल. या राईड्स भितीदायक असतात, परंतु अनेक तरुण मंडळी आपलं शौर्य दाखवण्यासाठी, तसेच आनंद मिळतो म्हणून अशा राईड्स करतात. कधी डोकं खाली-पाय वर, तर कधी उजवीकडून-डावीकडे असा रोलरकोस्टर फिरतो. याचा अनुभव घेणं फारच रोमांचक आहे. परंतु हे असे राईड्स धोकादायक देखील असू शकतात. कारण जर एक चूक जरी झाली, तरी ते लोकांच्या जीवावर बेतू शकतं.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. जो एका रोलरकोस्टर राईडचा आहे. हा फोटो पाहून आपल्याला त्यात काही विशेष असं वाटणार नाही. परंतु त्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही.
ही धक्कादायक घटना ब्रिटनमधील एका मनोरंजन उद्यानात घडली आहे. ब्लॅकपूल प्लेजर बीचवर 235 फूट उंचीवर एका मोठ्या रोलरकोस्टरवर लोक अडकले, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.
या राईडमध्ये लोक तासनतास 235 फूट उंचीवर खाली डोकं वर पाय या अवस्थेत हवेत लटकत राहिले.
नक्की काय घडलं?
डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 15 मे रविवारी दुपारी, ब्रिटनमधील ब्लॅकपूल प्लेजर बीच येथे बिग वन राईडमध्ये बसलेले लोक तांत्रिक बिघाडामुळे 235 फूट उंचीवर अडकले होते. लोकांनी आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही लोकांना सुखरूप बाहेर काढता आले.
जरी या घटनेत कोणाला काही झालेले नसले, तरी ही घटना फारच भीतीदायक आहे. कारण हवेत तासनतास उलटं अडकून राहाणं शक्य नाही.
मनोरंजन पार्कमधील रोलर कोस्टरसंबंधी ही पहिल घटना नाही. याआधी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, यूएस मधील कॅरोविंड्स मनोरंजन पार्कमध्ये रोलरकोस्टरने काम करणे थांबवल्यानंतर लोक सुमारे 45 मिनिटे उलटे लटकले. याआधी जपानमधूनही अशी बातमी आली होती, जेव्हा लोक एवढ्या उंचावरच्या राईडमध्ये अडकले होते.