दुबईची राजकुमारी देश सोडून पळाली, भारतीय समुद्र किनाऱ्यावर अडकली
दुबईची ३३ वर्षाची राजकुमारी शेख लतिफाने अमेरिकेत शरण घेतली आहे, ती दुबईचे शासक शेख मोहंमद बिन राशिद अल मकतौम यांची मुलगी आहे, राजकुमारीने दावा केला आहे की, सामान्य जीवन जगण्यासाठी ती देश सोडून आली आहे, मागील ३ वर्षापासून आपल्याला हॉस्पिटलमध्ये कैद करून ठेवण्यात आलं होतं.
दुबई : दुबईची ३३ वर्षाची राजकुमारी शेख लतिफाने अमेरिकेत शरण घेतली आहे, ती दुबईचे शासक शेख मोहंमद बिन राशिद अल मकतौम यांची मुलगी आहे, राजकुमारीने दावा केला आहे की, सामान्य जीवन जगण्यासाठी ती देश सोडून आली आहे, मागील ३ वर्षापासून आपल्याला हॉस्पिटलमध्ये कैद करून ठेवण्यात आलं होतं.
या आधीही एकदा देश सोडण्याचा प्रयत्न
ब्रिटनच्या मीडियाला पाठवलेल्या मेसेजमध्ये ३३ वर्षाच्या राजकुमारीने दावा केला आहे की, १६ वर्षाच्या वयात तिने एकदा देश सोडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून तिला संशयास्पद नजरेने पाहिलं जातं. तिला स्वतंत्र जीवन जगण्याची परवानगी नाही.
देश सोडून बाहेर जाण्यावर तिला बंदी
वर्ष २००० नंतर देश सोडून बाहेर जाण्यावर तिला बंदी आहे. ती गाडी देखील चालवू शकत नाही, २४ तास तिच्यावर नजर असते. तिचा स्वभाव अतिशय रागीट असल्याने, तिला कैद करून तिच्यावर उपचार सुरू होते. काही पाळीव प्राणी सोडून आपला कुणीही मित्र नसल्याचं ती म्हणते.
शेख मोहंमदच्या एकूण ६ बायका
लतिफा म्हणते की, शेख मोहंमदच्या ६ बायका आहेत, आणि ३० मुलं, ती सर्वात कमी उजेडात आलेल्या, बायकोच्या तीन मुलींपैकी एक आहे. लतिफाचं दुबईत कोणतंही सामाजिक जीवन नाही. फरार राजकुमारीच्या दाव्याप्रमाणे, या आधी देखील दोन राजकुमारी देश सोडून बाहेर गेल्या आहेत, त्यातील एकीला नंतर पकडण्यात आलं होतं.
फ्रान्सच्या गुप्तहेरसोबत फरार
लतिफा फ्रान्सच्या गुप्तहेराच्या मदतीनं पळून गेली आहे. हा गुप्तहेर बोटीने लोकांना दुबईतून बाहेर निघून जाण्यास मदत करतो. लतिफाने अमेरिकेत आश्रय मागितला आहे. यासाठी तिने अमेरिकेतील आपल्या वकिलाशी देखील संपर्क केला आहे.
दक्षिण भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आहे राजकुमारी
लातिफाने दावा केला आहे की, दक्षिण भारताच्या समुद्र किनाऱ्यावर ती आहे, ती म्हणतेय की, ती देश सोडून पळाली आहे, पण अजूनही तिला धोका आहे, तिला जबरदस्ती दुबईला परत घेऊन जावू शकतात.