दृष्ट लागली? 200 वर्षांपासून युद्ध न लढलेल्या देशात का वाटल्या जातायत `युद्धासाठी सज्ज व्हा!` सांगणाऱ्या चिठ्ठ्या?
War Leaflets: जगाच्या पाठीवर अशी अनेक राष्ट्र आहेत, जी तिथं असणाऱ्या शांतताप्रिय वातावरणासाठी, राजकीय आणि आर्थिक स्थैर्यासाठी ओळखली जातात.
War Leaflets: युद्धानं जगाच्या पाठीवर विविध समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी तणाव आणखी वाढवण्याचच काम केलं. जिथंजिथं युद्ध झाली, तिथंतिथं मानवतेचा अस्त झाला, हिंसाचार झाला आणि काही सिद्धांत समुळ नष्ट झाले. सध्या असाच एक देश अतिशय अनपेक्षितपणे युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे, तोसुद्धा तब्बल 200 वर्षांनंतर.
जवळपास अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी धुमसत असतानाच दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातील तणावाची परिस्थितीसुद्धा शमण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता जगाच्या पाठीवर आणखी एका युद्धाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून स्वीडन या देशात नागरिकांमध्ये जवळपास 50 लाखांहून अधिक चिठ्ठ्या वाटण्यात आल्या असून, यामध्ये नागरिकांना 'युद्धासाठी सज्ज व्हा!' अशी हाक देण्यात आली आहे.
देश युद्धाच्या उंबरठ्यावर असून, या देशात अन्नधान्य आणि पाण्याचा साठा करण्याच्या स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. स्वीडनचं शेजारी राष्ट्र फिनलँडही अशीच काहीशी तयारी करत असून, या देशानं एक नवं संकेतस्थळ तयार केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नॉर्वेमध्येही नागरिकांना चिठ्ठ्या दिल्या जात असून, युद्धजन्य परिस्थितीमध्ये अन्न, वस्त्र, निवाऱ्याची तजवीज करत जीव कसा वाचवता येईल याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
2022 मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर स्वीडन आणि फिनलँड या दोन्ही देशांनी अमेरिकेच्या नेतृत्त्वाअंतर्गत असणाऱ्या नाटोमध्ये सहभागी होण्याच्या दिशेनं पावलं उचलली, ज्यामुळं वर्षानुवर्षांपासून सुरू असणारी लष्करी गटनिरपेक्षता संपुष्टात आली. संकट किंवा युद्ध झाल्यास... असा नागरिकांना दिल्या जाणाऱ्या या चिठ्ठीचा मथळा असून, ही चिठ्ठी स्वीडिश सिविल कंटिंजेंसी एजेंसी (MSB)नं वितरित केल्याचं सांगितलं जात आहे.
हेसुद्धा वाचा : TATA कडून लोकप्रिय कारवर घसघशीत सूट; ह्युंडईही पडली मागे, किती कमी रक्कम मोजावी लागतेय माहितीये?
युद्धाची सुरुवात झाल्यास स्वीडनसाठी हे एक मोठं आव्हान ठरणार आहे. मागील 200 वर्षांमध्ये स्वीडननं कोणतंही युद्ध लढलेलं नाही, किंबहुना युद्धजन्य परिस्थितीशी दोन हात करण्याचा कोणताही अनुभव स्वीडनकडे नाही. इतिहासात डोकावलं असता, स्वीडननं अखेरचं युद्ध नॉर्वेसोबत 1814 मध्ये जिंकलं होतं, ज्यामध्ये हा देश विजयी झाला होता. हे तेच युद्ध होतं, ज्यामुळं डेन्मार्कच्या राजानं नॉर्वे स्वीडनच्या स्वाधीन करावं लागलं होतं.
ही संपूर्ण परिस्थिती अशा वेळी डोकं वर काढताना दिसत आहे, जेव्हा रशिया आणि युक्रेनची पाश्चिमात्य राष्ट्रांसमवेत असणारी मतभेदांची दरी आणखी रुंदावत आहे. तेव्हा आता स्वीडनच्या या युद्धाविषयीचा इशारा देणाऱ्या चिठ्ठ्यांचे परिणाम कुठवर दिसणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.