बीजिंग : खिडकीतल्या ग्रीलमध्ये मुलांना खेळू देणे किती धोकायदायक असते ते या व्हिडीओवरून लक्षात येईल. चीनमध्ये एका लहान मुलीला खिडकीतल्या ग्रीलवर खेळायला सोडून, तिची आई किराणासाठी दुकानात गेली, त्याचवेळी ही मुलगी ग्रीलमधूल खाली सटकली पण सुर्देवाने अडकली, आणि रडायला लागली, ती काही वेळाने खाली पडेल, असं वाटत असताना, शेजाऱ्यांना तिच्या रड़ण्याचा आवाज आला, अखेर शेजाऱ्याने बाहेरून जाऊन ग्रीलमधून त्या मुलीला आत ढकललं, पण तो ग्रीलचा सहारा घेऊन अर्धा तास लटकला, अखेर सुरक्षा दलाने खिडकीचे गज कापून त्याला बाहेर काढलं.