Nepal Plane Crash:  नेपाळच्या पोखरा विमानतळावर (pokhara airport) विमान कोसळल आहे (Nepal Plane Crash). या दुर्घटनेत आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. आता या विमान दुर्घटनेत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. चीनच्या (chiana) मदतीने नेपाळचे हे एअरपोर्ट बनवण्यात आलं होत. 14 दिवसांपूर्वी याचे उद्घाटन झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळमधील दुर्घटनाग्रस्त यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानात  या विमानात 68 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते. या विमानात 5 भारतीय प्रवासी असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याशिवाय 4 रशियन, 1 आयरिश, 2 कोरियन्स तर अर्जेंटिना आणि फ्रान्सच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. 


पोखरा विमानतळावर उतरताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं. खराब हवामानामुळे डोंगराला धडकून हे विमान सेती नदीत कोसळल आहे.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. विमान कोसळण्याआधीचा व्हिडिओसुद्धा समोर आला. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेपाळ सरकारनं पाच सदस्यांची समिती नेमली आहे. 


चीनच्या मदतीने बनवण्यात आले होते नेपाळमधील विमानतळ


जिथे ही दुर्घटना घडली ते नेपाळमधील पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आला आहे. या विमानतळाच्या  बांधकामासाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले होता.


धावपट्टीपासून अवघ्या 10 सेकंदाच्या अंतरावर विमान कोसळले


पोखरा विमानतळ प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार यती एअरलाइन्सचे विमान धावपट्टीपासून अवघ्या 10 सेकंदाच्या अंतरावर होते त्याचवेळी हे विमान कोसळले. एटीसी कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोखराची रनवे पूर्व-पश्चिम दिशेला बांधलेली आहे. विमानाच्या पायलटने आधी पूर्वेकडून उतरण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार त्याला परवानगी देण्यात आली होती.  मात्र, काही वेळातच वैमानिकाने पश्चिमेकडून उतरण्याची परवानगी मागितली आणि पुन्हा परवानगी मिळाली. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की लँडिंगच्या आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या, त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.