जोहान्सबर्ग : बारमध्ये मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोहान्सबर्ग इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आम्हाला मध्यरात्री फोन आला. मध्यरात्री बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती देण्यात आली. आम्ही तातडीने तिथे पोहोचलो. घटनास्थळावर पोहोचताच 12 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली. तर उर्वरित 2 जणांची नोंद नंतर झाल्याने हा आकडा 14 वर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


जखमींची संख्या 11 असून त्यांना रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरून एवढ लक्षात येत आहे की गोळीबार करणारा एक व्यक्ती नव्हता. 


एकापेक्षा जास्त लोकांच्या गटाने गोळीबार केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गोळीबार करण्यामागे नेमकं काय कारण असावं याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.