Snake Swallowed Golf Ball: साप दिसला तरी अनेकांचा थरकाप उडतो. कारण विषारी सापाची कायम भीती असते. सर्पदंशामुळे अनेकांचा जीव गेल्याचा घटना देखील घडल्या आहेत. म्हणून साप ज्या वाटेनं गेला त्या वाटेनं देखील जाणं अनेक जण टाळतात. साप आपलं भक्ष्य असलेला उंदीर, अंडी सहजपणे गिळतात. पण एका सापाची अमेरिकेच्या नॉर्न कोलोराडो गोल्फ कोर्टवर फजिती झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एका सापाने गोल्फ बॉल अंड समजून गिळलं आणि हा बॉल गळ्यातच अडकला.  ही घटना गोल्फ कोर्टवरील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी वाइल्डलाइफ सेंटरशी संपर्क साधून माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अशी घटना रोज पाहायला मिळत नाही. आमच्या टीमला मदतीसाठी बोलवण्यात आलं होतं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की, सापाने दोन बॉल गिळले आहेत. ते बॉल त्याच्या गळ्यातच अडकले होते. सापाला वाटलं की अंडी आहेत. त्यामुळे त्याची फसगत झाली.", असं वाइल्डलाइफ सेंटरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. वाइल्डलाइफ सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी 30 मिनिटांची शस्त्रक्रिया करत बॉल बाहेर काढले. 



वाइल्डलाइफ सेंटरने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत सापाने बॉल गिळल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, बॉल काढल्यानंतरचा फोटो देखील आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या फोटोंना लाईक केलं असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. अनेक युजर्सनी या फोटोखाली मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.