Sophie Rain Income : चांगल्या पगाराची नोकरी असावी किंवा कुणी व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायातून आपल्याला बक्कळ नफा मिळावा असे सगळ्यांनाच वाटते. पण, सगळेच कोट्यावधीची कमाई करतात असे नाही. मात्र, सोफी रेन (Sophie Rain)नावाची एक 20 वर्षाची तरुणी महिन्याला 30 कोटी रुपयांची कमाई करते. सोफीने तिच्या कमाईचा Screenshot सोशल मिडीवर शेअर केला आहे. सोफी असं करते तरी काय जाणून घेऊया. 


हे देखील वाचा... पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण 'या' देशात सापडली; अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफी रेन ही फ्लोरिडाची राहणारी आहे. सोफी रेन हिने सोशल मिडियावर तिची कमाई जाहीर केली आहे. सोफी रेनने सोशल मिडियावर स्क्रीन शॉट शेअर केला आहे. 43.4 मिलियन डॉलर अर्थात 367 कोटी असा तिचा कमाईचा आकडा आहे. 28 नोव्हेंबरपर्यंतची  ही वर्षभराची कमाई असल्याचे सोफी रेनने पोस्टमध्ये नमूद केले आहे. सोफी रेन महिन्याला 30 कोटींची कमाई करते. 


हे देखील वाचा... पुणेकरांना 4 तासांत बँकॉकला जाता येणार; दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा


सोफी रेन ही अत्यंत सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे. वयाच्या 17 वर्षी तिने काम करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम तिने हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. मात्र, आता सोफी रेन कोट्यावधीची कमाई करत आहे. तिच्या कमाईचा तपशील पाहिला असता दिवसाला ती 1 कोटी रुपये कमावते. सोफी रेन बक्कळ पैसा कनावत असल्याने तिने तिच्या कुटुंबियांना कर्जातून मुक्त केले आहे. कमावलेल्या पैशांमधून सोफी रेन हिने 70 टक्के पैसे विविध व्यवसायांमध्ये गुंतवून भविष्याची तरतूद केली आहे. 


सोफी रेन काय काम करते?


20 वर्षांची सोफी रेन ही मॉडेल आहे. सोशल मिडिया तसेच विविध साईटवर ती ति तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. 2017 पासून ती सोशल मिडियावर influencer म्हणून फोटो व्हिडिओ पोस्ट करत आहे. आता सोफी रेन खूपच पॉप्युलर झाली आहे. अनेकांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी पेड मेंबरशिप घेतली आहे.  यामाध्यमातून सोफी रेन कोट्यावधींची कमाई करत आहे.