Taiwan Earthquake VIDEO: तैवान शहर (Taiwan) शनिवारी (17 सप्टेंबर 2022) भूकंपाच्या झटक्याने हादरलं. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरुच असतानाच रविवारी (18 सप्टेंबर 2022) पुन्हा एकदा भूकंपाने लोकांना भयभीत केलं .  गेल्या 24 तासांमध्ये तैवानमध्ये दुसऱ्यांदा भूकंप (Earthquake) आला. तैवानच्या आग्नेय भागात 6.8-रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने एक व्यक्ती ठार आणि सुमारे 150 जण जखमी झाल्यानंतर, सोमवारी (19 सप्टेंबर 2022) या प्रदेशात अनेक आफ्टरशॉक बसले, ज्यात राजधानी तैपेईमध्ये (Taipei) 5.5-रिश्टर स्केलचा भूकंपाचाही समावेश आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैवानमध्ये जेव्हा भूकंप आल्यानंतर शहरातील भयान वास्तव दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आहे. हे व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. तैवानच्या उत्तर भागातील चिशांग शहराजवळ भूकंपचा केंद्रबिंदू (Earthquake Epicentre) जमिनीच्या केवळ सात किलोमीटर खाली होता. या धक्क्याने युली शहराजवळ तीन मजली इमारत (Building) उद्ध्वस्त झाली. 



काळजाचे ठोके चुकविणारे व्हिडीओ (Taiwan Earthquake VIDEO)


तैवानमधील वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाच्या धक्कानंतर काय परिस्थिती होती ते कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यात एका रेल्वे स्थानकावर (Railway Station) प्रवासी असलेली रेल्वेगाडी रूळावरून खाली (Derailed) उतरली. तर कुठे जंगलात काही लोक अडकले. अचानक भूकंप आल्यावर इनडोअर बेडमिंटन खेळत असताना खेळाडू भयभीत झाले. (Taiwan Earthquake VIDEO 2022 trending Video Viral on social media nm)



अंगावर काटा आणणारे हे व्हिडीओ भूकंपाची तीव्रतेची जाणीव करु देतो. काही सेकंदाच्या या भूकंपाने अनेकांचं आयुष्य उद्धवस्त झालं. भूकंपानंतर शहरात एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर भूकंपाचे भीतीदायक आणि भयानक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. 



2016 मध्ये दक्षिण तैवानमध्ये झालेल्या भूकंपात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1999 मध्ये 7.3 तीव्रतेच्या भूकंपात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 



अचानक आलेल्या या भूकंपामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.