Evergreen Marine Crop: कधी कधी काही कंपन्या या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर इतक्या खूश होतात की, त्यांना इतके फायदे देतात की तुम्ही कधी त्याचा विचारही (Company Benefits) करू शकत नाही. सध्या अशाच एका कंपनीची सगळीकडे चर्चा आहे व या कंपनीनं चक्क त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकाच वेळी सलग चार वर्षांची सॅलरी बोनस (Salary Bonus) म्हणून दिली आहे. हो, तुम्ही जाणून आश्चर्याचा धक्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तायवान (Taiwan) या देशातील एवरग्रीन मरीन क्रॉप (Evergreen Marine Crop) या कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना चक्क चार वर्षांची सॅलरी (Four Year Salary) देऊ केली आहे. त्यात त्यांना हा बोनसही दिला आहे. त्यामुळे सगळेच कर्मचारी खूश झाले आहेत. सध्या या बातमीनं सगळीकडेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की नक्की या कंपनीनं बोनस देण्यामागचं नेमकं कारण तरी काय? (Taiwan Shipping Company Gives 50 month mega bonuses to employee international news marathi)


कामाच्या खुशीत दिला बंपर बोनस... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, यावेळेस लोकांच्या कामानुसार आणि त्यांच्या ग्रेडनुसार (Grade in appraisal) या कपंनीत कर्मचाऱ्यांना कपंनीनं 50 महिन्यांची म्हणजेच 4 वर्षांऐवढी सॅलरी दिली आहे. हा बोनस त्याचं लोकांसाठी दिला आहे जे तायवानचे रहिवासी आहेत आणि या कंपनीची सेवा या कंपनीत राहूनच करतात. याबद्दल कंपनीनं अद्याप काही अधिकृत खुलासा केलेला नाही त्यामुळे कंपनीकडून असं सांगितलं आहे की वर्षाचा बोनस हा त्याच्या वर्षाच्या शेवटी त्या वर्षातील कामाच्या हिशोबानुसार दिला जाईल. 


या कंपनीनं याबद्दल अधिक खुलासा केलेला नाही. या कंपनीनं मागील दोन वर्षात शॉपिंग इंडस्ट्रीमध्ये (Shopping) चांगली प्रगती केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 2020 सालानंतर 2022 पासून या कंपनीची चांगली भरभराटही झाली आहे. या कंपनीचा रेवेन्यू हा दोन वर्षात दुप्पट झाला आहे. समोर आलेल्या एका बातमीनुसार, पुर्वीही या कंपनीतील कर्मचाऱ्यांना असाच बोनस दिला होता परंतु हा बोनस फारसा नव्हता. यावेळी मात्र हा बोनस तगडा आहे. कंपनीला मागील दोन वर्षांतील झालेल्या मोठ्या प्रॉफिटमुळे (Company Revenue) कंपनीनं कर्मचाऱ्यांना असा बोनस दिला असल्याचं सांगितले आहे. 


हेही वाचा - Salman Khan ची EX-GIRLFRIEND पुन्हा मैदानात; म्हणाली, ''माफी माग, कबूल कर की...''


सध्या सगळीकडेच मंदीचे वातावरण सुरू आहे. त्यामुळे अशाप्रकारे कंपनीनं फार मोठा बोनस दिल्यानं सगळीकडेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून अशाप्रकारे कंपनीनं बोनस दिल्यानं खूप मोठ्या प्रमाणात इतर कंपनीचे कर्मचारीही (Employement) खुश झाले आहेत. आपल्यालाही अशा कंपनीनं बोनस द्यावा यासाठी अनेक कंपन्यांचे कर्मचारीही मनोमनं इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.