कब्जा मिळताच लबाड लांडग्यांची चाल बदलली, अफगाण नागरिकांच्या मोर्चावर गोळीबार
मोर्चेकरांवर तालिबानांनी सैनिकांनी ( talibani fighters) गोळीबार केला.
काबुल : अफगाणिस्तानावर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा मिळवला. या तालिबान्यांविरोधात अफगाणी नागरिकांनी (Afghani Citizens) झेंडा मोर्चा काढला. अफगाणिस्तानातील जलालाबाद आणि खोश्त या दोन मोठ्या शहरांमध्ये नागरिकांनी बुधवारी देशाचा झेंडा घेत रस्त्यावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानचे नागरिक सहभागी झाले. या दरम्यान त्यांनी 'अफगाणिस्तान जिंदाबाद' अशा घोषणाही दिल्या. या मोर्चेकरांवर तालिबान्यांनी गोळीबार केला. मात्र तालिबान्यांना हा मोर्चा पाहवला नाही. त्यांनी या नागरिकांनावर थेट गोळीबार केला. (talibani fighters firing on afganistani protesters)
मोर्चेकरांवर गोळीबार
अफगाणिस्तानच्या नागरिकांनी झेंडा मोर्चाशिवाय जलालाबाद स्केवअरवर देशाचा झेंडा फडकवला. हा सर्व प्रकार तालिबान्यांना काही पचणी पडला नाही. त्यामुळे या लबाड लांडग्यांनी या नागरिकांवर जलालाबादमध्ये बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात काही जीवितहाणी झाली का, याबाबत अजूनही काही माहिती समोर आलेली नाही.
पत्रकारांनाही मारहाण
तालिबान्यांनी केवळ अफगाणिस्तानच्या नागरिकांनाच नाही, तर मोर्चाचे वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांनाही सोडलं नाही. या तालिबान्यांनी पत्रकारांना मारहाण केली. या दरम्यान काही पत्रकारांना दुखापत झाली.