Nepal Plane Crash : नेपाळमध्ये (Nepal) रविवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघाताने (Plane Crash) सर्वांना हादरवून सोडलं आहे. नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखरा (Pokhara)  येथे जाणारे यती एअरलाइन्सचे एटीआर - 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते अशी माहिती समोर आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भीषण अपघातात आतापर्यंत 72 पैकी 40 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विमानामध्ये पाच भारतीय देखील प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी सुरक्षा दल पाठवण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी आणि सर्व सरकारी यंत्रणांना तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघाताचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान दहल काठमांडू विमानतळावर रवाना झाले आहेत. पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.


भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर


आता या विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ विमान कोसळण्यापूर्वीचा आहे. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच हे विमान कोसळले. धावपट्टीपासून काही मीटर अंतरावर असताना अचानक विमान डाव्या बाजूकडे झुकले. यानंतर विमान कोसळले.  या अपघातात 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.



कसा झाला अपघात?


मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले आणि नदीत कोसळले. यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली.


10 विदेशी नागरिकांचाही समावेश


यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन यांनी सांगितले की, ट्विन इंजिन असलेल्या एटीआर 72 या विमानात 72 लोक होते. यामध्ये दोन नवजात बालके, 4 क्रू मेंबर आणि 10 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथक सर्वतोपरी मदत केली जात असून अपघाताच्या चौकशी केली जाणार आहे.