Crime News In Marathi: चित्रपट, मालिका, पुस्तकातील पात्रांच्या कळत-नकळत आपल्या व्यक्तिमत्वांवर प्रभाव पडत असतो. कधी-कधी खलनायकांचाही प्रभाव नकळत होत असतो. जपानमध्येही अशीच एक घटना घडली आहे. जपानमधील न्यायालयाने क्टोटा हतोरी नावाच्या तरुणाला 23 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचे वय 26 वर्ष आहे. क्टोटाने जोकरचा ड्रेस परिधान घालून केलेल्या एका कृत्याने संपूर्ण देश हादरला होता. 2021 मध्ये हॅलोवीनच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळं अजूनही काही जणांच्या अंगावर शहारे येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्टोटाने कॉमिक बुकमधील  विलेन द जोकर प्रमाणे कपडे परिधान करुन ट्रेनमध्ये घुसला होता. त्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. क्टोटाने जवळपास 70 वर्षांच्या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला होता. ट्रेनला आग लावून 12 जणांची जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. 


स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यादिवशी गुन्हा घडला तेव्हा आरोपीचे वय 24 वर्षे इतके होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तर, जगभरातदेखील या घटनेची चर्चा होती. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याने आणखीन धक्कादायक खुलासा केला आहे. तो जोकरच्या व्यक्तीरेखेने प्रभावीत झाला होता. त्याला अधिका अधिक लोकांचे नुकसान व्हावे, अशी इच्छा होती. 


पोलिसांनी हातोरीला अटक केल्यानंतर त्याने हल्ला करण्यासाठी ज्वलनशील पदार्थ वापरल्याचे कबूल केले होते. त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही इच्छा व्यक्त केली होती. मात्र, टोकियोच्या जिल्हा न्यायालयाच्या ताचिकावा खंडपीठाने सुनावणी केलेल्या निकालात त्याला 23 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला. जपानमध्ये हिंसक गुन्हे फार दुर्मिळ आहेत. हा देश गुन्हेगारीच्या कमी दरासाठी ओळखला जातो. मात्र, वार आणि गोळीबाराच्या घटनाही अधूनमधून घडतात. गेल्या वर्षी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाली, या घटनेनेही संपूर्ण देश हादरला होता. 


ऑगस्ट 2021मध्ये टोकियामध्ये एका व्यक्तीने प्रवासी ट्रेनवर चाकूने हल्ला करत नऊ जणांना जखमी केले आहेत. यात एख गंभीर जखमी झाला होता. तर त्याच महिन्यात टोकिया सबवे स्टेशनवर अॅसिड हल्ल्यात दोन व्यक्ती जखमी झाले होते.