Tree of 40 Fruit : जगभरात हाजरो प्रकारची फळ झाडे आहेत. एका झाडवर एकाच प्रकारचे फळ येते. म्हणजेच आंब्याच्या झाडाला आंबो लागातात. पेरुच्या झाडाला पेरु, चिकूच्या झाला चिकू... मात्र एकाच झाडावर वेगवेगळ्या प्रकारची फळं आल्याचे कधी तुम्ही ऐकले आहे का? असं एक झाड आहे ज्याला एक दोन नाही तर तब्बल 40 प्रकारची फळं येतात. पृथ्वीवर अशी फक्त 16 झाडं आहेत. जाणून घेऊया या अनोख्या झाडा विषयी.


हे देखील वाचा... दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अनोखे झाड  ट्री ऑफ 40 फ्रूट (Tree of 40 Fruit) या नावाने ओळखले जाते. ट्री ऑफ 40 फ्रूट हे झाड कृषी क्षेत्रातील चमात्कार आहे (Agriculture). अमेरिकेतील सेराक्यूज युनिव्हर्सिटीमध्ये व्हिज्युअळ आर्ट्सचे प्राध्यापक सॅम वॉन ऐकेन  (Sam Van Aken)  हे या अनोख्या झाडाचे जनक आहेत.  या अनोख्या झाडाची संकल्पना  खूपच आश्चर्यकार आहे. या झाडाची किंमत ही तशीच आहे. या एका झाडाची किंमत 19 लाख रुपये आहे. न्यूयॉर्कमधील सात राज्यात ट्री ऑफ 40 फ्रूट ची फक्त 16 झाडं आहेत.


प्राध्यापक सॅम वॉन ऐकेन यांनी विज्ञानाच्या मदतीने या झाडीची निर्मिती केली आहे. न्यूयॉर्कमधील एका कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्यांना या झाडाची कल्पना सुचली. सन 2008 पासून त्यांनी झाडाच्या निर्मीच्या प्रयोगाची तयारी सुरु केली.  ग्राफ्टिंग टेक्नीकच्या मदतीने त्यांनी ट्री ऑफ 40 हे अद्भुत झाड तयार केले. ग्राफ्टिंग टेक्नीकच्या माध्यमातून झाड तयार करण्यासाठी हिवाळ्यात झाडाची एक फांदी कळीसोबत तोडली जाते. नंतर ही फांदी मुख्य झाडात छिद्र करून लावली. अशा प्रकारे त्यांनी तब्बल 40 प्रकारच्या झाडांच्या फांद्या जोडल्या आणि त्यांचा प्रयोग यश्वसी झाला. ट्री ऑफ 40 फ्रूट या झाडाला बोरं, चेरी, नेक्टराइन, खुबानी अशा फळांसह  पेरूपर्यंत, ब्लॅकबेरी, केळी आणि सफरचंद देखील येतात.