Trending Love story Video : बालपणी शेजारी राहणारी असो किंवा शाळेत अगदी कॉलेजमध्ये प्रत्येकाचं कोणी ना कोणी क्रश नक्कीच असतं. अगदी शाळेत टीचरवर तर बालपणी  अनेकांच क्रश असतं. मोठेपणी अनेक जण बालपणीचं क्रश कधीच विसरुन जातात. पण काही जण आजही पहिलं क्रश मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवतात. त्या व्यक्तीच्या गोड आठवणी ते अधून मधून काढतात. ती आज काय करत असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतं असतो. (trending love story 78 years man Proposed to school crush after 60 years at airport video viral top trends now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेतील तुमची क्रश अचानक अनेक वर्षांनी तुमच्या समोर आली तर तुम्ही काय कराल?  78 वर्षांच्या आजोबांना 60 वर्षांनी विमानतळावर त्यांची शाळेतील क्रश दिसली आणि मग काय...या आजी आजोबांची लव्ह स्टोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


हटके लव्हस्टोरी!


प्रेमाला वयाची बंधन कधीच नसतं. आयुष्याचा कुठल्याही टप्प्यात तुम्हाला प्रेम होऊ शकतं. प्रेम ही एक खूप सुंदर भावना आहे. उतार वयात तर खऱ्या अर्थाने प्रेमाची गोडी, प्रेमाचा अर्थ कळतो. त्यावेळी एका खऱ्या जोडीदाराची गरज असतं असं म्हणतात. वयाच्या याच टप्प्यात जर तुमच्या आयुष्यात शाळेतील क्रश ज्या व्यक्तीवर मनोमन अनेक वर्ष प्रेम करत असतो ती व्यक्ती आली तर...


हे भावनाच किती मस्त वाटते ना...सोशल मीडियावर सध्या ज्या आजी आजोबांची प्रेम कहाणी चर्चेली जातेय. ते ऐकून त्या क्षणाचा व्हिडीओ पाहून तुम्ही पण भावूक व्हाल हे नक्की. 


झालं असं की, 78 वर्षांच्या थॉमस मॅकमीकिन ज्यावेळी शाळेत होते तेव्हा नैन्सी गैम्बेल या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडले होते. शाळेतील प्रेम हळूहळू वाढतं होतं. शाळा संपली आणि सुरु झालं कॉलेज लाइफ...कॉलेज वेगवेगळे पण ते अधून मधून भेटायचे आणि सुंदर क्षण एकत्र घ्यालवायचे. पण शाळेतील हे प्रेम काही लग्नबंधनात अडकलं नाही. दोघांचे लग्न वेगवेगळ्या व्यक्तीशी झालं. 


त्या दिवशी जेव्हा ती समोर आली!


मनाच्या कोपऱ्यात आजही ती होती. 2012 मध्ये शाळेतून फोन आला आणि स्नेहसंमेलनात बोलवण्यात आली. शाळेतील स्नेहसंमेलन म्हटलं तर तीही तिथे येणार म्हटल्यावर अनेक वर्षांनी त्यांची भेट होणार होती. ती आली आणि त्यांचं काही चार शब्द बोलणंही झालं. पण पुन्हा ते दोघे आपल्या आपल्या संसाराकडे वळले. 


फिल्मी स्टाइल क्रशला प्रपोज!


दिवसे पुढे जात होते. ते दोघेही आपल्या संसारातील जबाबदारी अतिशय योगरित्या सांभाळत होते. आता थॉमस यांचं वय  78 झालं होतं. त्यांच्या बायकोचं निधन झालं. काही दिवसांनी त्यांना कळलं नैन्सीचे पतीचंही निधन झालं. आता मात्र त्यांना वाटलं आपल्या पहिल्या प्रेमासोबत पुढील आयुष्य घालवायला पाहिजे. 


मग काय आजोबा थॉमस एकद फिल्मी स्टाइल आपल्या पहिल्या प्रेमाला लग्नाच्या मागणी घालण्यासाठी विमानतळावर पोहोचले. आजोबा गुडघ्यावर बसून नैन्सीला प्रपोज करत होते. या भावूक क्षणाचा व्हिडीओ काढण्यात येत होता. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर sarcasticschool या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आजोबांनी इतक्या सुंदररित्या आजीला लग्नाची मागणी घातली की, आजी लग्नाला नाही म्हणून शकली नाही. हे लव्हबर्ड लवकरच लग्न करुन नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. 60 वर्षांनी त्यांचं शाळेतलं प्रेम पूर्ण होणार आहे.