Thumps Up Emoji : (Whats App) व्हॉट्सअप, (Instagram) इन्स्टाग्राम, फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. अनेकजण तर, आजकाल Phone Call ऐवजी या अॅपच्या माध्यमातून चॅटिंगलाच प्राधान्य देतात. खासगी कारणांनी असो किंवा मग एखाद्या व्यावसायिक कारणानं असो. ही माध्यमं संवाद आणखी सोपा करून गेली. पण, प्रत्येक वेळी त्या माध्यमातून भावना योग्यरित्या पोहोचतीलच असं नाही. याचाच प्रत्यय सध्या एका व्यक्तीला येत आहे, ज्याला एका इमोजीमुळं लाखोंच दंड झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वास बसत नाहीये? अहो हे खरंय! कॅनडामध्ये घडलेल्या या घटनेमुळं सध्या अनेकांनाच धक्का बसला आहे. कारण, हा प्रकार तुमच्याआमच्यासोबतही घडूच शकतो. कॅनडामधील सस्केचेवान येथे 2021 मध्ये हा प्रकार घडला. जिथं एका धान्य खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं स्थानिक शेतकरी, क्रिस अॅक्टर यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी ऑनलाईन मेसेज पाठवला. यासाठीचा करारही पाठवला गेला. या मेसेजचं उत्तर म्हणून क्रिसनं Thumps Up Emoji अर्थात अंगठ्याचं चिन्हं पाठवलं. सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. पण, नोव्हेंबरला मात्र क्रिसला शेतमालाचा पुरवठा करता आला नाही आणि या एचा चुकीची शिक्षा त्याला आता भोगावी लागत आहे. 


इमोजीच्या अर्थाचा अनर्थ आणि मग वाद... 


शेतकऱ्याच्या मते त्यानं पाठवलेला थम्प्स अपचा इमोजी त्याला करारपत्र मिळालं याला दुजोरा देणारा होता. इथं कुठंच आपण करारासाठी सहमत आहोत असं दर्शवण्याचा त्याचा हेतू नव्हता. पण, दुसरीकडून खरेदीदाराचा मात्र गैरसमज झाला. शेतकऱ्यानं आपल्या या करारातील अटीशर्ती मंजूर असल्याचं म्हणत Thumps Up Emoji पाठवल्याचा पूर्वग्रह खरेदीदारानं पकडला आणि इथंच वादाची ठिणगी पडली. 


हेसुद्धा वाचा : कालपरवाच्या अभिनेत्याला सलमानचा फोन; नंतर बघतो म्हणत त्यानं केलं Ignore, पाहा 'तो' आहे तरी कोण


वाद इतका वाढला की हे इमोजी प्रकरण कॅनडाच्या न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि तिथं 'थम्स-अप' इमोजीला अधिकृत होकाराचं चिन्हं मानलं गेलं. परिणामी शेतकऱ्याला 61,442 डॉलर अर्थात साधारण 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, ज्यामुळं आता एक इमोजी पाठवणं त्याला आयुष्यभराची अद्दल घडवून गेलं आहे. 


या इमोजीचा नेमका अर्थ तरी काय? 


आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला चॅटमध्ये रिप्लाय देतो तेव्हा अनेकदा इमोजी सर्रास वापरतो. पण, या इमोजींचा नेमका अर्थ आपल्याला ठाऊक असतो का? फार क्वचितच इमोजी आहेत ज्याचा अर्थ आपल्याला ठाऊक असतो. Thumps Up चा इमोजी चॅटमध्ये एखाद्या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी किंवा ओके म्हणण्यासाठी वापरला जातो. तर, थम्प्स डाऊन पाठवल्यास एखादा मेसेज किंवा काम पसंत न आल्याला हा इशारा असतो. त्यामुळं तुम्हीही इथून पुढं कोणाला Thumps Up पाठवत असाल तर जरा जपून!