Shocking Viral Video: चीनी नागरिक (China) कोणतेही प्राणी किंवा किडे खातात असं बोललं जातं. म्हणजे साप, पालीपासून अगदी वटवाघळापर्यंत खातात असं त्यांच्याबदल्ल प्रसिद्ध आहे. त्यामुळेच कोरोनासारख्या (Corona) महामारीची सुरुवात चीनमधून झाल्याचा दावाही केला जात आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेळा चीनमधल्या स्ट्रीटफूड (Street Food) स्टॉलचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात स्टॉलवर चित्रविचित्र किडे विक्रीला असल्याचं पाहिला मिळतं आणि ते काही लोकं ते खातानाही दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत एक तरुण जीवंत किडा खाताना दिसत असून यानंतर त्याच्या चेहऱ्यावर गंभीर परिणाम झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. एक तरुण चॉपस्टिकच्या मदतीने एक जिवंत किडा पकडतो. त्यानंतर तो तोंडात टाकून खाऊ लागतो. यादरम्यान, हा किडा त्या व्यक्तीच्या तोंडात डंख मारतो. याचा गंभीर परिणाम तरुणाला भोगवा लागतो. त्या तरुणाचा चेहरा पूर्णपणे सूजलेला दिसत आहे. त्या तरुणाचे ओठ पूर्णपणे सूजलेले दिसत असून एक डोळादेखील सुजला आहे. 


व्हायरल होणार हा व्हिडिओ सोशल मीडियाव वेगाने व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ  @Instantregretss नावाने शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जातात. पण यात काही वेळा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. या तरुणाचीही तीच गत झाल्याचं पाहिला मिळतंय. भविष्यात तो तरुण पुन्हा अशी चूक करणार नाही हे नक्की.  या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालणं हा मुर्खपणा असल्याचं काही युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युजर्सने अशा व्हिडिओमुळे अनुकरण केलं जाऊ शकतं त्यामुळे यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 



वटवाघुळ खाणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ
काही महिन्यांपूर्वी एक तरुणी वटवाघूळ खात  आणि त्याचं सूप पित असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. चीनमध्ये साप, वटवाघुळ, कुत्रा, पक्ष्यांच्या मासांची सर्रासपणे विक्री होते आणि बऱ्याचशा हॉटेलमध्ये खाल्लंही जातं. शास्त्रांनी असंही म्हटलं आहे की, वटवाघुळापासून पसरलेला  SARS (Severe Acute Respiratory Syndrome) हा व्हायरस सापापासून लोकांमध्ये पसरला आहे.