video : चॉकलेटने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटला आणि...
रस्त्यावरील अपघातात केमिकल गॅस अथवा इतर कोणत्या पदार्थांनी भरलेला ट्रक उलटल्याचे तुम्ही ऐकले असेल.
मुंबई : रस्त्यावरील अपघातात केमिकल गॅस अथवा इतर कोणत्या पदार्थांनी भरलेला ट्रक उलटल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र लिक्विड चॉकलेटने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याची घटना पोलंडमध्ये घडलीये. रिपोर्टनुसार सिक्स लेनवरील या रोडवर लिक्विड चॉकलेट वाहून नेणारा ट्रक उलटला आणि ट्रॅफिक जाम झाली. अधिकाऱ्यांच्या मते, लिक्विड चॉकलेट संपूर्ण रस्त्यावर पसरले. काही वेळानंतर हे चॉकलेट घट्ट होऊ लागले. ते इतके घट्ट झाले की ते वितळवण्यासाठी हजारो टनची गरम पाण्याची गरज पडली.
थंड झालेले चॉकलेट हे बर्फापेक्षाही कडक असते. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते. दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ड्रायव्हरला थोडी दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत वाया गेलेले चॉकलेट हे लाखो डॉलरचे असू शकते.
या घटनेनंतर पोलंडच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळ सील केले होते. ट्रक अपघातानंतर मधील रोलिंग तोड रस्त्याच्या मध्यभागी आला. यामुळे संपूर्ण रस्त्यावरील ट्रॅफिक जाम झाले. दुर्घटनेनंतर एक फुटापर्यंत चॉकलेट पसरले होते.