नवी दिल्ली : अमेरिकेकडून पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे. अमेरिकेने पाकच्या फाटा परिसरात हल्ला करण्यात आला आहे. ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचे दोन कमांडर ठार झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने या अगोदरही पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्नान घातले आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील आदिवासीबहुल केंद्रशासित प्रदेशामधील दहशतवाद्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा मोहरक्या एहसान खावेरी याच्यासह आणखी दोन अतिरेक्यांचा ठार करण्यात आल्याचं अधिकृत वृत्त समोर आलं आहे.



पाकिस्तानच्या हिंगू जिल्ह्याजवळ हा ड्रोन हल्ला करण्यात आला असून अमेरिकेने ड्रोनद्वारे दोन क्षेपणास्त्रांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त केले आहेत. अमेरिकेची ही कारवाई म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशाराच असल्याचं सांगण्यात येत आहे.


अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया करून पाकमध्ये लपणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी. या दहशतवाद्यांना अटक करावी किंवा त्यांना देशाच्या बाहेर हाकलून द्यावे, असा इशारा अमेरिकेने या आधीच पाकिस्तानला दिला होता.