वॉशिंग्टन : अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला चांगला मित्र म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका भारतातील आमच्या मित्रांना व्हेंटीलेटर दान करत असल्याचे ट्वीट त्यांनी केले. कोरोनाच्या या संकटात आम्ही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. लस संशोधनात देखील आम्ही सहकार्य करत आहोत. अदृश्य शत्रूला आम्हाला हरवायचे असल्याचे देखील ट्रम्प यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि अमेरिका कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र येऊन लढा देत आहेत. भारत-अमेरिकेचे महान वैज्ञानिक आणि संशोधक यावर उपाय शोधत असल्याचे ते म्हणाले. कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मी काही कालावधीआधीच भारतातून आलोय आणि आम्ही भारतासोबत एकत्र काम करत आहोत. अमेरिकेमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत. यातील अनेकजण लस शोधण्याच्या कामात आहेत. 



ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आपला चांगला मित्र म्हटले. 


अमेरिकेने चीन विरूद्ध सर्वात मोठ असं आक्रमक रुप धारण केलं आहे. अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला चीनलाच जबाबदार धरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात कोरोना पसरल्यामुळे चीनशी सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये ८०,००० अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे.



ट्रम्प यांची चीनला धमकी 


ट्रम्पने फॉक्स बिझनेस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, 'अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो. आम्ही सर्व संबंध तोडू शकतो.' गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती चीनच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत. खासदार आणि तज्ज्ञांची असं म्हणणं आहे की, चीनच्या निष्क्रियतेमुळे वुहानमधील कोरोना जगभर पसरला. 


एका प्रश्नाचं उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की,सध्या ते चीनी राष्ट्रपती शी चिनफिंगसोबत सध्या कोणतीच चर्चा करू इच्छित नाही. महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांची चिनफिंगसोबत खूप चांगले संबंध आहे. पुढे ते म्हणतात की,चीनने त्यांना निराश केला आहे. तसेच अमेरिकेने चीनला अनेकदा कोरोनाच्या चाचणीकरता वुहानच्या प्रयोगशाळेत जाण्याची परवानगी द्यावी. मात्र त्यांनी ती नाकारली.