मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला एका पाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढत आहे. अभिनेत्री आपल्या फॅशनसेन्स तसच आपल्या दमदार अभिनयमुळे याचबरोबर आपल्या डान्समुळे ओळखली जाते. काहि दिवसांपूर्वी मिस युनिवर्स कॉम्पिटीशनमध्ये ती जजच्या भूमिकेत आपल्याला दिसली. याचबोरबर अभिनेत्रीने देशाचं नाव उंचीच्या शिखरावर नेवून ठेवलं. त्याचबरोबर अनेक दिवस यासाठी तिला किती फिस मिळाली असेल अशी देखील चर्चा रंगली होती.  शेवटी आता या गोष्टीचा खुलासा झालाच आहे की, उर्वशीने जज बनण्यासाठी किती फीस मिळाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस यूनिवर्समध्ये जज बनलेल्या उर्वशीला मिळाली एवढी फिस
2021 साली मिस यूनिवर्सच्या जजच्या खुर्चीत बसलेल्या उर्वशीला १.२ मिलियन डॉलर्स  मिळाले होते. इंडियन करन्सीनुसार, उर्वशीला ८ करोड रुपये मिळाले होते. ही एक खूप मोठी रक्कम आहे. कदाचित उर्वशी सिनेमासाठी देखील एवढीच रक्कम आकारते. मात्र यासाठी उर्वशीला फार मोठी रक्कम मिळाली आहे. त्याचबरोबर उर्वशी देशाचं नाव देखील उंचीवर घेवून गेली आहे.


२०२१ हे वर्ष भारतासाठी अनेक यशाचं शिखर गाठणार होतं. पंजाबची हरनाज सांधूने तर कमाल केली. हरनाज २०२१ ची मिस युनिवर्स झाली. तर दुसरीकडे उर्वशीला जजच्या पॅनलवर  बसण्याचा मान मिळाला. उर्वशी देशातच नव्हेतर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अभिनेत्री लवकरच इंस्टाग्रामवर ४४ मिलीयन फॉलोअर्स पूर्ण करणार आहे.  नेहमीच उर्वशी आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.