प्योंगयांग : इंटरनेटपासून कायम दूर राहणाऱ्या उत्तर कोरियाने अखेर ऑनलाईन दुनियेत पाऊल ठेवले आहे. त्यामुळे आता लाईव्ह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेणे, तसेच स्मार्टफोनवरून एकमेकांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. इतकंच नाही तर  ई-शॉपिंग आणि ऑनलाईन बँकिंगची सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सारे कामकाज कॉम्प्युटरच्या नेटवर्क इंट्रानेटवर केले जाईल. यापूर्वी अफ्रीकी देश इरित्रिया सोडल्यास उत्तर कोरिया हा इंटरनेट वापराच्या बाबतीत जगातील सर्वात मागासलेला देश होता. आतापर्यंत उत्तर कोरियातील अधिकतर लोकांना इंटरनेटचा वापर माहित नव्हता. तसंच या देशातील लोकांकडे कॉम्प्युटर किंवा इमेल अॅड्रेस असणे, ही देखील दुर्मिळ बाब आहे. 


मात्र आता ही परिस्थिती हळूहळू बदलेल. कारण इंटरनेटच्या वापराला सुरुवात करणारा किम जोंग हा उत्तर कोरियातील पहिला नेता आहे.