Viral Video :  मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते... असाच एक हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on Social media) होतो आहे. आयुष्यातील काही क्षण असे असतात ज्याला शब्दात मांडणे अवघड असतं. आई-मुलांचं नातं तर फार खास असते. आई लेकराला सतत हाक मारत असते, राजा हे खालं का, ते केलं का...आपल्यालाही आईचं असे सतत हाक मारणं खूप आवडतं. तिचा आवाज आला नाही तर आपण खूप भावूक होतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असाच एका माय-लेकाचा भावनिक करणारा क्षण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 


वाचा - Forbes Best Employer Ranking 2022: मुकेश अंबानींचं सर्वात मोठं यश, टॉप 100 मध्ये  Reliance कंपनी 'या' स्थानावर


Video पाहून डोळ्यात येईल पाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता एक तरुण हॉस्पिटलमध्ये आहे. शेजारी त्याची आई बसली आहे. त्या तरुणाच्या कानात इयरफोन सारखं काहीतरी यंत्र लावण्यात आलं आहे. त्यानंतर त्याची आई त्याचं नाव (Eduardo, Eduardo, Eduardo) घेऊन त्याला हाक मारते आणि इशाऱ्याने सांगतो हो मला ऐकू येतं आहे...हो या तरुणाने वयाच्या 35 वर्षांनंतर आईचा आवाज ऐकला आहे. आपल्या मुला ऐकू येतं आहे आणि आपण आईची हाक केली हा क्षण प्रत्येकांला भावूक करुन जातो. 



 


वाचा - Tirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता...


हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ (Emotional Video)


व्हिडीओमधील तरुण 2 वर्षांचा (deaf man) असताना त्याला एका आजारामुळे ऐकायला येतं नव्हतं. त्याचावर उपचार सुरु करण्यात आले होते. या उपचाराला अखेर यश मिळालं आणि आज तो ऐकू शकतो आहे. ज्या क्षणांची (Good News Movement) तो तरुण, त्याची आई आणि कुटुंबातील इतर सदस्य वाट पाहत होते तो क्षण जेव्हा आला...त्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरंगत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.