Viral: इथे मृत व्यक्तींचे मृतदेह खाण्याची आहे प्रथा..तेही कच्च मांस..
जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासोबतच भीतीच वलय कापून काढण्यासाठी मृतदेह खाल्ला जातो
Shocking Rituals of Funeral : भारत देश (INDIA)विविधतेने नटलेला आहे ,अनेक जाती धर्म समुदायाचे लोक एकत्र राहतात अशी भारताची ओळख आहे .
जेवढी विविधता माणसांमध्ये आहे तितकीच त्यांच्या प्रथा आणि सण समारंभांमध्येही पाहायला मिळते.असं म्हणतात कि एक गाव बदललं कि प्रथा बदलत जातात,
अशा बऱ्याच प्रथा आहेत ज्या आपल्याला आजही माहित नाही आहेत. हे झालं फक्त भारताविषयी पण तुम्ही कधी हा विचार केलात का कि या जगात कितीतरी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत
त्या सर्वांच्या किती वेगवेगळ्या प्रथा असतील . संपूर्ण जगभरात अशा अनेक अजब गजब प्रथा आहेत ज्या आपल्याला माहीतच नाहीयेत . चला जाणून घेऊया अशाच काही प्रथांविषयी
मात्र काही देश असे आहेत जिथे अंत्यसंस्काराचे नियम (FUNERAL RULES) आणि पद्धती जरा विचित्रच आहेत . काही गोष्टींवर विश्वास ठेवणसुद्धा कठीण होऊन बसेल इतकं धक्कादायक आहे .
दक्षिण मेक्सिकोमध्ये (SOUTH MEXICO) मासिक एक वेगळी प्रथा आहे ज्यामध्ये मृत्यूनंतर मृतदेह घरीच पुरून ठेवला जातो .त्यामागे एक विश्वास आहे कि मृत्यूनंतरसुद्धा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबतच राहतो.आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अंत्यसंस्कारासाठी लागणारे पैसे इथल्या लोकांकडे नसतात इतके ते गरीब आहेत .
चीन (CHINA)आणि फिलिपाईन्समध्ये(PHILIPPINES) मृत्यनंतर मृतदेह शवपेटीत ठेऊन तो उंच खडकावर किंवा उंच ठिकाणी ठेवला जातो त्यामागे असा समज आहे कि जितका उंच ठेवला जाईल तितका थेट स्वर्गात जाण्यास मदत होते ..
तिबेटमधील बौद्ध समुदायामध्ये मेल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते गिधाडांना खाण्यास दिले जातात अशीच काहीशी पद्दत पारशी समजत सुद्धा केली जाते यात फक्त Tower of silence मृतदेह ठेऊन जिहादन खायला देण्याची धर्मप्र आहे
दक्षिण कोरियामध्ये (south korea)मृतदेहातील काही अवयव स्टोनमध्ये जातं करून ते घरात ठेवलं जातात .
पापुआ न्यू गिनीचे मेलेनेशियन(papua new guinea) आणि ब्राझीलचे(brazil) काही आदिवासी लोक चक्क मृतदेह कच्चा खाऊन टाकतात .जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासोबतच भीतीच वलय कापून काढण्यासाठी मृतदेह खाल्ला जातो
आणि मुखतः यात घरातील मुलं सहभागी होतात .
दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह कबरीतून काढतात, त्यांना सजवतात आणि नाचतात असं केल्याने मेलेला माणूस जिवंत होऊन परत येतो अशी इथे पद्दत आहे