पाकिस्तान मंत्र्यांचा अजब कारनामा, कैचीने नाही तर दाताने कापली फीत : VIDEO
मंत्र्यांचा देशीपणा सोशल मीडियावर चर्चेत
मुंबई : पाकिस्तानच्या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पंजाब प्रांतातील कारागृहमंत्री फयाज अल हसन चोहान चक्क दाताने फीत कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ खुद्द मंत्री फयाज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की,'आपल्या क्षेत्रात दुकानाचं उद्घाटन करण्याचा अनोखा अंदाज'.
असे सांगितले जात आहे की पंजाब प्रांताचे कारागृहमंत्री फयाज अल हसन चौहान एका शोरूमचे उद्घाटन करण्यासाठी आले होते, जिथे मंत्री लेस कापणार होते, परंतु त्यांनी ते कात्रीने कापली नव्हती. यानंतर, मंत्र्याने आपल्या हातांनी रिबन पकडली आणि चक्क दाताने रिबन कापली. मंत्री फयाजचा हा पराक्रम पाहून, लोकं मोठ मोठ्याने हसू लागले.
हा व्हिडिओ स्वतः शेअर करताना पंजाब प्रांताचे कारागृह मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते फयाज अल हसन चौहान यांनी लिहिले- 'तुमच्या विधानसभा मतदारसंघात दुकान उघडण्याची संधी अनोखी शैली ... !!! कात्री बोथट आणि वाईट होती ... !!! दुकानदाराला पेचातून वाचवण्यासाठी मी एक नवीन विश्वविक्रम केला ... !!! '
पंजाब प्रांताचे कारागृह मंत्री फयाज अल हसन चोहान यांचा दाताने रिबन कापण्याचा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक टिप्पणी करून फयाज अल हसनची चेष्टा करत आहेत आणि बरेच लोक त्याची स्तुती देखील करत आहेत.