मुंबई : सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, जेथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपल्या आवडिचे आणि मनोरंजक कन्टेन्ट पाहायला मिळतात. ज्यामुळे एकदा का एखादा व्यक्ती सोशल मीडियावर आला, तर त्याचा वेळ कसा निघून जातो, हे त्याचं त्यालाच कळत नाही. सोशल मीडियावर आपल्याला कॉमेडी  व्हिडीओ देखील पाहायला मिळतात, जे आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा आणणारे असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो सर्वांच्याच अंगावर काटा आणणार आहे. शिवाय हा व्हिडीओ आपल्याला हसवणारा देखील आहे.


सोशल मीडियावर तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घरबाहेर गार्डनमध्ये बसला आहे. तेथे तो लॅपटॉपवर काही काम करत आहे. तेव्हा त्याच्या मागून एक विषारी साप येतो. परंतु हा व्यक्ती आपल्या कामात इतका व्यस्त असतो की, त्याला आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे याकडे लक्ष नसतं.



मग हा साप हळूहळू पुढे येतो आणि या व्यक्तीच्या सीट खाली येतो. थोड्या वेळाने हा साप पुढे या व्यक्तीच्या पाया जवळ येतो आणि उडी मारतो. ज्यामुळे हा व्यक्ती देखील उडी मारतो.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सापाला पाहून हा व्यक्ती खूप घाबरला आहे. ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर या व्यक्तीने सोशल मीडीयावर हा व्हिडीओ शेअर केला. जो जोरदार व्हायरल झाला आहे.